Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे मनपाच्या कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे, कनिष्ठ अभियंता अनंत ठोक, शिपाई दत्तात्रय किंडरे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) पुणे महानगरपालिकेच्या (PMC) कोथरुड क्षेत्रीय कार्यालयातील (Kothrud Bavdhan Regional Office) सहाय्यक आयुक्त सचिन चंद्रकांत तामखेडे Assistant Commissioner Sachin Chandrakant Tamkhede (वय-34), कनिष्ठ अभियंता अनंत रामभाऊ ठोक Junior Engineer Anant Rambhau Thok (वय-52), शिपाई दत्तात्रय मुरलीधर किंडरे Peon Dattatraya Muralidhar Kindre (वय-47) तिघांना 15 हजार रुपयांची लाच घेताना (Pune Bribe Case) रंगेहात पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

याबाबत 31 वर्षीय कंत्राटदाराने (Contractor) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली आहे. तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी कोथरुड येथील ड्रेनेज लाईन (Drainage Line) व काँक्रिटीकरणाच्या (Concretization) कामाचे बिल (Work Bill) मिळण्यासाठी सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांची भेट घेतली. त्यावेळी तामखेडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली.

 

तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीची अधिकाऱ्यांनी 31 मार्च रोजी पडताळणी केली असता तक्रारदार यांच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी तामखेडे यांनी तडजोडीत 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांच्याकडून लाच घेण्यासाठी कनिष्ठ अभियंता अनंत ठोक याने मदत केली.

 

 

सोमवारी (दि.11) पुणे एसीबीने कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात सापळा रचला.
तक्रारदार यांनी सचिन तामखेडे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी लाचेची रक्कम अनंत ठोक यांच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार तक्रारदार हे ठोक यांच्याकडे लाचेची रक्कम देण्यासाठी गेले.
मात्र, ठोक यांनी लाचेची रक्कम शिपाई दत्तात्रय किंडरे यांच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार तक्रारदार यांनी किंडरे यांच्याकडे लाचेची 15 हजार रुपयांची रक्कम दिली.
किंडरे याने लाचेची रक्कम स्विकारल्यावर तिघांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींवर कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud police station) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबं-धक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक भारत साळुंखे (Police Inspector Bharat Salunkhe) करीत आहेत.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Sachin Tamkhede, Assistant Commissioner, Kothrud Bavdhan Regional Office, Pune Municipal Corporation, Anant Thok, Junior Engineer, Dattatraya Kindre are traped by acb pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा