Lata Mangeshkar Award | पहिला लता मंगेशकर पुरस्कार PM नरेंद्र मोदींना जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award ) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना जाहीर करण्यात आला आहे. मंगेशकर कुटुंबातर्फे (Mangeshkar Family) उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांनी सोमवारी (दि.11) पत्रकार परिषदेत लता मंगेशकर पुरस्कारांची (Lata Mangeshkar Award) घोषणा केली. याच पत्रकार परिषदेमध्ये उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांनी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 पुरस्कारांची (Master Dinanath Mangeshkar Award 2022 Award) देखील घोषणा करण्यात आली.

 

उषा मंगेशकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 24 एप्रिल रोजी मुंबईत षण्मुखानंद हॉल मध्ये (Shanmukhananda Hall Mumbai) होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यास पंतप्रधानांनी अनुकुलता दर्शवल्याची माहिती त्यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या, पंतप्रधान मोदी लतादीदींना बहीण मानायचे. नरेंद्र मोदी जे देशसेवा करत आहेत, जे काम करत आहेत ते पाहूनच त्यांना लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहे.

 

प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव
पुरस्कारांबाबत बोलताना हृदयनाथ मंगेशकर म्हणाले,
प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने (Lata Mangeshkar Award) सन्मानित केले जाणार आहे.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांना देखील या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
दीदींच्या नावाला शोभेल अशाच पुरस्कारर्थीला हा पुरस्कार दिला जाणार आहे.

राहुल देशपांडे यांना दीनानाथ पुरस्कार
पत्रकार परिषदेत दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा करण्यात आली. संगीत (Music) क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांना तर सिनेमात भरीव योगदानाबद्दल आशा पारेख (Asha Parekh), जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
तसेच उत्कृष्ट समाजिक सेवेचा पुरस्कार मुंबई डबेवाले संघटनेला (Mumbai Dabewala Association) देण्यात आला आहे.
नाट्यक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी ‘संज्याछाया’ नाटकाची निवड करण्यात आली आहे.

 

Web Title :-  Lata Mangeshkar Award | first lata mangeshkar award announced to pm narendra modi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा