Anti Corruption Bureau (ACB) Pune | 15 हजार रुपयाची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक आणि खाजगी इसम अँटी करप्शनच्या जाळ्यात, 2 दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रार अर्जावरुन गुन्हा (FIR) दाखल न करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी (Demand Of Bribe) करुन 15 हजार रुपये लाच स्विकारताना बारामती तालुका पोलीस ठाण्यातील (Baramati Taluka Police Station) पोलीस उपनिरीक्षक विलास दत्तात्रय धोत्रे PSI Vilas Dattatraya Dhotre (वय – 35) आणि खासगी व्यक्ती ऋषिकेश नंदकुमार पतंगे Rishikesh Nandkumar Patange (वय – 24) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) सापळा रचून अटक (Arrest) केली. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Pune Crime)

 

याबाबत 25 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार दिली आहे. तक्रारदार यांच्या विरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज (Complaint Application) दाखल केला असून तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे याने 50 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली.

तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची शनिवारी (दि.9) पडताळणी केली असता तक्रारदार यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी खासगी इसम ऋषिकेश पतंगे याने पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे यांच्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीमध्ये 15 हजार रुपये लाच मागून ती स्वीकारली. स्वीकारलेली लाचेची रक्कम धोत्रे यांच्याकडे देताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. दोघांना विशेष न्यायालय बारामती (Special Court Baramati) येथे हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर (Police Inspector Praneta Sangolkar) करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Pune | Sub Inspector of Police and private person caught in bribery of Rs 15000 2 days police custody

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा