२५०० रुपयांची लाच घेताना वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – तेंदूपाने जमा केल्याची नोंद घेण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती अडीच हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनरक्षक नितीन चनबस स्वामी याला लाचलुचपत प्रतिबंधकाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वनरक्षक नितीन चनबस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f867c169-d12e-11e8-8aa1-b7d6ea15268b’]

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय, हदगावअंतर्गत तामसा, माळेगाव बिटचे वनरक्षक नितीन स्वामी यांनी तक्रारदार व त्यांच्या सोबतच्या मजुराचे प्रोत्साहनात्मक रकमेचा धनादेश जमा केल्याची व चालू वर्षी रजिस्टरमध्ये तेंदूपाने जमा केल्याची खरी नोंद घेण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने तामसा येथील बसस्थानक परिसरात पंचासमक्ष पडताळणी केली होती.

धनगर आरक्षणावरुन समाजात गैरसमज पसरविले जात आहेत

[amazon_link asins=’B07DJHV6S7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9f386043-d12f-11e8-9773-4b5dcc4b3c2a’]

मिळालेल्या माहितीवरुन १३ आॅक्टोबर रोजी तामसा बसस्थानक परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सापळा रचण्यात आला. यावेळी वनरक्षक नितीन स्वामी याला अडीच हजारांची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a8c34e7a-d12f-11e8-be38-87dc73cbd859′]

याप्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलीस अधीक्षक संजय लाठकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअधीक्षक विजय डोंगरे, पो.ना. साजीद अली, शेख चाँद अली साब, सुरेश पांचाळ, अमरजितसिंग चौधरी, शिवहार किडे यांचा या कारवाईत सहभाग होता.

तेंदू पानाप्रकरणी एका तालुक्यात लाच लुचपत प्रतिबंधक अधिकारी यांनी कार्यवाही केल्यामुळे इतर तालुक्यातील अधिकारी सतर्क होतील अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

जाहिरात