Anti Corruption Bureau Kolhapur | 25 लाखाच्या लाच प्रकरणी 2 ‘वजनदार’ पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; संपुर्ण पोलिस दलात प्रचंड खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau Kolhapur | कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पोलीस कॉन्स्टेबल (Kolhapur Police Local Crime Branch) 25 लाखाच्या लाचप्रकरणी एसीबीच्या (Anti Corruption Bureau Kolhapur) जाळ्यात (Kolhapur Crime) सापडले आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करून मोक्का अंतर्गत कारवाईची धमकी देऊन 25 लाखाच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 10 लाखांची लाच उकळणारे विजय केरबा कारंडे (Vijay Kerba Karande) (वय 50, रा.उचगाव, ता.करवीर) व किरण धोंडीराम गावडे (Kiran Dhondiram Gawde) (वय 37, रा. केदारनगर मोरेवाडी, ता.करवीर) यांना अटक (Arrested) करण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (ACB Kolhapur) शुक्रवारी केली.

याबाबत माहिती अशी की, कोल्हापूर मधील एका वकिलाच्या मुलाचा मोटरकार, टुव्हिलर वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. वकीलाच्या मुलाने 8 दिवसांपूर्वी पनवेल (Panvel) येथून जुन्या वापरातील स्पोर्ट्स बाईक खरेदी करून कोल्हापुरात आणले होते. टुव्हिलर भंगारमध्ये काढण्यासाठी त्यांनी रितसर परवाने घेतले होते. पण, विजय कारंडे (Vijay Karande) व किरण गावडे (Kiran Gawde) या दोघांनी वकील मुलाला गाठले. मुंबई-पुण्यातून दुचाकी चोरून आणून कोल्हापुरात विकतो काय असं म्हणत मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात तुला अटक करून तुझ्यावर मोका लावतो, तुझी सार्वत्रिक बदनामी करतो अशी धमकी दिली. तसेच हे प्रकरण थांबवायचे असेल तर 25 लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर कारवाई करेन अशी धमकी दिली. (Anti Corruption Bureau Kolhapur)

दरम्यान, विजय कारंडे व किरण गावडे हे पोलीस संबंधित तरुणाला 18-19 जानेवारी पोलीस मुख्यालयात चौकशीसाठी घेऊन गेले होते. 25 लाख दिल्याशिवाय सुटका होणार नाही, अस म्हटल्याने युवक घाबरला. शेवटी त्याने 10 लाख रूपये देण्यास मान्य केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (Anti Corruption Bureau Kolhapur) तक्रार दिली. या तक्रारीवरून आज (शुक्रवारी) सकाळी एसीबीच्या पथकाने पोलीस मुख्यालय परिसरातील अलंकार हॉलजवळ पडताळणी केली असता विजय कारंडे व किरण गावडे या दोघांनी पुन्हा पैशाची मागणी केली. नंतर दुपारच्या सुमारास पोलीस मुख्यालयाच्या पिछाडीला वकिल मुलाकडून 10 लाख घेऊन विजय कारंडे व किरण गावडे यांनी स्वतःच्या गाडीच्या डिकीत ठेवली. त्याक्षणी एसीबीने त्या दोघांना अटक (Arrested) केली व रोकड ताब्यात घेतली.

दरम्यान, संशयित कॉन्स्टेबल विरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात (Shahupuri Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda) आणि उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत (DySP Adinath Budhwant) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : Anti Corruption Bureau Kolhapur | 25 lakh bribery cases Anti Corruption Bureau
Kolhapur Police Local Crime Branch Police Vijay Kerba Karande and Kiran Dhondiram Gawde arrested Pune Division ACB Kolhapur Unit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajesh Tope | राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय
सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे