Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Khadse | राज्यातील नगरपंचायतीचे निकाल हाती येत आहेत. जळगावच्या बोदवड नगरपंचायत निवडणुकींच्या (Jalgaon Nagar Panchayat Result) जागांचे निकाल आता समोर आले आहेत. याठिकाणी शिवसेनेने (Shiv Sena) आपली बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या निकालांमध्ये एका जागेवर राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपाला (BJP) समसमान मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात भाजपाचे विजय शिवराम बडगुजर (Vijay Shivram Badgujar) हे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागत आहे.

 

बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने 9 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 7 तर भाजपला 1 जागा मिळाली आहे. बोदवड नगरपंचायतील एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) गटात गळती लागली आहे. विशेष म्हणजे तेथील शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील (Shiv Sena MLA Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं आपली विजयाची कमान रोवली आहे.

 

दरम्यान, ‘ईश्वर चिठ्ठी’नं भाजपाला खाते तरी उघडता आले. नाहीतर भाजपाच्या पारड्यात एकही उमेदवार नसल्याचं चित्र उभं होतं,
मात्र ऐन वेळ भाजपला संधी मिळाली आहे. कारण एका जागेवर राष्ट्रवादी आणि भाजपाला समसमान मते मिळाली.
त्यामुळे ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात भाजपा उमेदवार निवडून आले.
भाजपाचे विजय शिवराम बडगुजर यांचं ईश्वर चिठ्ठीने भाग्य उजळलं आहे.

 

Web Title :- Eknath Khadse | jalgoan nagar panchayat election result shiv sena has majority in jalgoan bodwad nagar panchayat setback to eknath khadse bjp win 1 seat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pooja Hegde Instagram | कडाक्याच्या थंडीत पूजा हेगडेने चढवला इंटरनेटचा पारा, बिकिनी फोटोंमुळे चाहते झाले घायाळ

 

12 BJP MLAs Suspension | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने ठेवला राखून, ठाकरे सरकारवर ओढले ताशेरे

 

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख