Anti Corruption Bureau Nagar | लाच प्रकरण ! अहमदनगर मनपाचे मुख्य लेखाधिकारी प्रविण मानकरच्या पुण्यातील घरात सापडलं ‘घबाड’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  Anti Corruption Bureau Nagar | ठेकेदाराने केलेल्या कामाचे बील काढण्यासाठी 20 हजार रुपयांची लाचेची मागणी (Demand for bribe) केल्याप्रकरणी अहमदनगर महानगरपालिकेतील मुख्य लेखाधीकाऱ्याला (Chief Accountant) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Nagar) बुधवारी ताब्यात घेतले. प्रविण गोपाळराव मानकर Pravin Gopalrao Mankar (वय-52 मुळ राहणार – 198, दिल्ली गेट, मानकर गल्ली, अहमदनगर, हल्ली मुक्काम- 102, फॅन्टसी, उत्तम टाऊन स्केप, विश्रांतवाडी, पुणे) यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात (tofkhana police station) बुधवारी गुन्हा (FIR) दाखल केला होता. मानकर याला आज (गुरुवार) न्यायालयात हजर केले असता शुक्रवार (दि.22) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

प्रवीण मानकर याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Nagar) कारवाई केल्यानंतर त्याच्या पुण्यातील (Pune) घराची झडती घेतली असता घरामध्ये 11 लाख 50 हजार रुपयांची रोकड, 540 ग्रॅम सोन्याचे दागिने (Gold jewelry), दीड किलो चांदीच्यावस्तू (Silver) मिळाल्या आहेत. तसेच तीन फ्लॅटची कागदपत्र मिळाळी आहे.
घरात सापडलेल्या रोख रक्कमेबाबत पोलिसांनी मानकरच्या पत्नीकडे चौकशी केली.
मात्र, त्यांना या रक्कमेबाबत कोणतेही वैध कारण देता आले नसल्याने पोलिसांनी रक्कम जप्त केली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर (Deputy Superintendent of Police Harish Khedkar) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे
(Police Inspector Pushpa Nimse) या करीत आहेत.

 

काय आहे प्रकरण ?

तक्रारदार (वय-34) यांनी व त्यांचे मावसभाऊ यांनी ठेकेदार (Contractor) म्हणून नगर महापालिकेच्या केलेल्या कामाची बिले मंजूर करुन तक्रारदार यांना धनादेश (Check)
देण्याच्या मोबदल्यात मानकर यांनी 25 हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी 7 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्रवीण मानकर यांच्या विरोधात तक्रार (Anti Corruption Bureau Nagar) केली.
त्याच दिवशी विभागाने पडताळणी केली असता तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी करुन 15 हजार स्विकारण्याची संमती दर्शवली.
त्यानुसार आज तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले.

 

Web Title : Anti Corruption Bureau Nagar | Ahmednagar Municipal Corporation Chief Accounts Officer Pravin Mankar arrested by acb nagar in bribe case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ahmednagar Crime | धक्कादायक ! शिर्डी संस्थान पुन्हा एकदा अधिकार्‍यामुळं चर्चेत; नराधमानं पाठवले महिला साईभक्तांना अश्लिल व्हिडीओ अन् मेसेज

Pune News | पुणे शहर राष्ट्रवादी युवती सेलच्या अध्यक्षपदी सुषमा सातपुते तर कार्याध्यक्षपदी श्रुती गायकवाड

Dr. Amol Kolhe In PCMC | खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘एन्ट्री’नंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक ‘अ‍ॅक्शन’मध्ये