Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – न्यायालयाने काढलेले वॉरंट (Warrant) रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना (Accepting Bribe) पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला (ASI) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) रंगेहाथ पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) ही कारवाई घोडेगाव पोलीस ठाण्यात (Ghodegaon police station) आज (मंगळवार) केली. कोंडाजी दामोदर रेंगडे Kondaji Damodar Rengade (वय-53) असे लाच घेताना रंगेहाथ पकलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

 

कोंडाजी रेंगडे हे घोडेगाव पोलीस ठाण्यात कर्यरत आहेत. तक्रारदार (वय-34) यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल आहे. या गुन्ह्याच्या सुनावणीला तक्रारदार न्यायालयात हजर राहत नसल्याने न्यायालयाने तक्रारदार यांच्याविरुद्ध वॉरंट काढले आहे. न्यायालयाने काढलेले वॉरंट रद्द करुन घेण्यासाठी रेंगडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीमध्ये दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते.

 

तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Pune) तक्रार केली. प्राप्त तक्रारीची विभागाने पडताळणी केली. त्यावेळी रेंगडे याने वॉरंट रद्द करुन देण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पुणे एसीबीच्या (Pune ACB)पथकाने आज सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक कोंडाजी रेंगडे यांना रंगेहाथ पकडले. रेंगडे यांच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उप अधीक्षक शीतल घोगरे (Deputy Superintendent of Police Shital Ghogare) करीत आहेत.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Pune | ASI of pune rural police arrested by acb pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात जादुटोणा करण्याची भिती दाखवून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; भोंदूबाबाला वाकड पोलिसांकडून अटक

MPSC Exam | 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली

Pune Vehicle sales | पुण्यात 6 महिन्यांत 63 हजारांहून जादा वाहनांची विक्री

PM Modi’s New Bulletproof Car | बॉम्ब अन् गोळ्या देखील निष्प्रभ ! पंतप्रधान मोदींना मिळाली 12 कोटींची बुलेट प्रूफ कार, फीचर्स जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य