Anti Corruption Bureau Pune | बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 1 लाखाच्या लाचेची मागणी ! महिला पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अँटी करप्शनच्या जाळ्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – तक्रार अर्जावरुन बलात्काराचा (Rape) गुन्हा (FIR) दाखल न करण्यासाठी एक लाखांची लाच मागून तडजोडीत 70 हजार रुपये स्विकारताना (Accepting Bribe) महिला पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) सहायक पोलीस उपनिरीक्षकाला (ASI) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) रंगेहात पकडले आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) कारवाई करताच सहायक पोलीस उपनिरीक्षक लाचेच्या रक्कमेसह फरार झाला आहे. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 2) सांगवी पोलीस ठाण्याच्या (Sangvi police station) परिसरात करण्यात आली आहे.

 

महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सिध्दराम सोळुंके Hema Siddharam Solunke (वय- 28), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळकृष्‍ण देसाई (Ashok Balkrishna Desai) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहे. सोळुंके आणि देसाई हे सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी 42 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Pune) तक्रार केली आहे.

 

तक्रारदार यांच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज आला असून या तक्रार अर्जाची चौकशी महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके या करीत आहेत. तक्रार अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सोळुंके यांनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. सोळुंके यांच्या सांगण्यावरुन सहायक पोलीस उपनिरीक्षक देसाई याने तडजोडी करुन 70 हजार रुपये मागितले.

 

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (ACB, Pune) तक्रार केली. त्यानुसार पथकाने 25 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली. त्यावेळी सोळुंके यांच्या सांगण्यावर देसाई यांनी एक लाख रुपये लाच मागून तडजोडीत 70 हजार लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज (गुरुवार) तक्रारदार यांना 70 हजार रुपयांची रक्कम घेऊन पाठवण्यात आले. तक्रारदार यांच्याकडून देसाई याने लाच स्विकारली. ACB चे अधिकारी त्यांना पकडण्यासाठी गेले असता पथकातील अधिकारी यांना धक्का देऊन देसाई दुचाकीवरुन लाचेच्या रक्कमेसह फरार झाला आहे. तर महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके (PSI Hema Solunke) यांना ताब्यात घेण्यात आले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक सीमा आडनाईक (Deputy Superintendent of Police Seema Adnaik),
पोलीस निरीक्षक भरत साळुंखे (Police Inspector Bharat Salunkhe), सहायक पोलीस फौजदार शेख,
पोलीस हवालदार नवनाथ वाळके, पोलीस नाईक वैभव गिरीगोसावी, पोलीस शिपाई पूजा पागिरे यांच्या पथकाने केली.

 


Web Title :- 
Anti Corruption Bureau Pune | Demand for Rs 1 lakh bribe for not filing rape case! Assistant Sub-Inspector of Police (ASI) Ashok Desai with Women Police Sub-Inspector (PSI) Hema Siddharam Solunke in Anti-Corruption net

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Property Tax | 50 लाख रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या मिळकतधारकांसाठी ‘अभय योजना’ ! 730 मिळकतधारकांकडे 1100 कोटी रुपयांची थकबाकी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे 85 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anti Corruption Bureau Pune | पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई ! 70 हजाराच्या लाच प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक (PSI) ‘जाळ्यात’ तर सहाय्यक फौजदार ‘फरार’