PMC Property Tax | 50 लाख रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या मिळकतधारकांसाठी ‘अभय योजना’ ! 730 मिळकतधारकांकडे 1100 कोटी रुपयांची थकबाकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मिळकतकराची थकबाकी वसुली (PMC Property Tax) करण्यासाठी सत्ताधारी भाजपच्यावतीने (BJP) शेवटच्या टप्प्यात ५० लाख रुपयांहून अधिक थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ आणण्याच्या (pmc property tax abhay yojana) हालचाली सुरू आहेत. मिळकत कर थकबाकीबाबत कुठलिही कायदेशीर प्रक्रिया नसलेल्या ७३० मिळकतींकडे अकराशे कोटी रुपयांची थकबाकी (PMC Property Tax) आहे. दरम्यान, विरोधी पक्षांमध्ये थकबाकी वसुलीसाठीचा स्लॅब ठरविण्यावरून मतभेद असून कॉंग्रेसने बड्या थकबाकीदारांसाठी अभय योजना आणून प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करू नये अशी भुमिका घेत या योजनेला विरोध केला आहे.

 

मिळकतकराच्या वसुलीसाठी सत्ताधारी भाजपने मागीलवर्षी अभय योजना राबविली होती. ही अभय योजना ५० लाख रुपयांच्या आतील थकबाकीदारांसाठी होती. त्यापुढील थकबाकीदारांना या योजनेतून वगळावे अशी विरोधी पक्षांची उपसूचना मान्य करूनच एकमताने या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. मागीलवर्षी राबविण्यात आलेल्या अभय योजनेतून सुमारे ४५० कोटी रुपयांची वसुली झाली (PMC Property Tax) होती. या योजनेमध्ये थकबाकीवर आकारलेल्या दंडाच्या रकमेवरील व्याजावर ७५ टक्के सूट देण्यात आली होती.

महापालिकेचे (Pune Corporation) उत्पन्न वाढविण्यासाठी सत्ताधारी भाजपने ५० लाख रुपयांवरील थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्याची तयारी सुरू केली आहे. यामधून मोबाईल टॉवर्सची थकबाकी तसेच थकबाकी विरोधात न्यायालयात गेलेल्या थकबाकीदारांना वगळण्यात येणार आहे. सद्यस्थितीत ५० लाख रुपयांच्यावर मिळकतकर, त्यावरील दंड आणि व्याजाची थकबाकी असलेले ७३० मिळकतदार असून त्यांच्याकडे सुमारे १ हजार १०० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

 

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेत्या व विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (pmc opposition leader deepali dhumal)
यांनी २ कोटी रुपयांच्या पुढे थकबाकी असलेल्या मिळकतदारांसाठी अभय योजना राबवावी अशी मागणी केली आहे.
तर कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल (PMC Congress Group Leader Aba Bagul)
यांनी मिळकत करासोबतच अन्य मार्गाने महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सोडून सत्ताधारी भाजप बड्या थकबाकीदारांना अभय देत आहे.
हा प्रामाणिक करदात्यांवर अन्याय असून त्याला आमचा विरोध राहील, असे निवेदन प्रसिद्धीला दिले आहे.

 

Web Title :- PMC Property Tax | Abhay Yojana for property owners with arrears of more than Rs 50 lakh! 730 property owners in arrears of Rs 1100 crore

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anti Corruption Bureau Pune | पुण्याच्या अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई ! 70 हजाराच्या लाच प्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक (PSI) ‘जाळ्यात’ तर सहाय्यक फौजदार ‘फरार’

Board Exam Fee | कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! 10 वी आणि 12 वीचे परीक्षा शुल्क होणार माफ

Pune Crime | घरफोडी व वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार विमानतळ पोलिसांकडून गजाआड, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त