Anti Corruption | 2 लाख 20 हजाराची लाच घेताना शाखा अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –  Anti-Corruption | पाटबंधारे विभागाच्या (Department of Irrigation) माध्यमातून केलेल्या कामाचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात दोन लाख 20 हजाराची लाच घेताना शाखा अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (Anti-Corruption) रंगेहाथ पकडले आहे. मुरलीधर पाटील असं लाचखोर शाखा अभियंत्याचे नाव आहे. तब्बल 2 लाख 20 हजार रुपयाची (2 lakh 20 thousand) लाच प्रकरणी शाखा अभियंता ACB जाळ्यात सापडल्याने पाटबंधारे विभागात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहितीपथकाच्या नुसार, पाटबंधारे विभागाच्या (Department of Irrigation) नवापूर (Navapur) तालुक्यातील रंगवली प्रकल्पाचे संरक्षक भिंत आणि पुलाचे काम करणाऱ्या कंपनीच्या संबंधित व्यक्तीने याबाबत तक्रार दिली आहे.
यावरून धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने (ACB) ही कारवाई केली आहे.
तर, या प्रकल्पाचे काम पूर्ण केल्यानंतर तक्रारदाराने बिल काढण्यासाठीची कार्यवाही केली होती.
यासाठी त्यांनी शाखा अभियंता मुरलीधर पाटील (Branch Engineer Murlidhar Patil) यांच्याशी संपर्क साधला असता.
या कामात सहकार्य करण्याचे आश्वासन देत शाखा अभियंता पाटील यांनी तक्रारदाराकडे तब्बल दोन लाख २० हजाराच्या लाचेची मागणी केली हाेती.

दरम्यान, यावरून तक्रारदारांनी धुळ्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) उपअधीक्षक सुनील कुराडे (Deputy Superintendent Sunil Kurade) यांना संपर्क करून तक्रार दिली.
या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक (PI) प्रकाश झोडगे (Prakash zodange)आणि मनजीतसिंग चव्हाण (Manjeet Singh Chavan) यांनी याठिकाणी सापळा रचला.
या दरम्यान, लाचेची रक्कम स्वीकारताना मुरलीधर पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले.


Web Title :
Anti Corruption | Irrigation Branch Engineer Murlidhar Patil arrested in Dhule for accepting bribe of Rs 2 lakh 20 thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nitin Landge Bribe Case | …म्हणून न्यायालयाने पिंपरी मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगेंचा जामीन फेटाळला, येरवडा कारागृहात रवानगी

Bank Rules | SBI, HDFC, ICICI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! 30 सप्टेंबरला बंद होणार आहे ही सुविधा; जाणून घ्या

Modi government | मोदी सरकार आज ‘ई-श्रम पोर्टल’ सुरू करणार, ३८ कोटी कामगारांना होणार लाभ