Anti Corruption | काय सांगता ! होय, तब्बल 22 लाखांची लाच घेतलेला पोलीस निरीक्षक पुन्हा सेवेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anti-Corruption | पोलीस दलामधून बडतर्फ केलेले पोलीस निरीक्षक (PI) आनंद भोईर (Anand Bhoir) यांना पुन्हा पोलीस दलात घेण्यात आलं आहे. 1 जानेवारी 2019 रोजी दारु दुकान मालकाकडून 22 लाखांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भोईरला रंगेहात पकडले होते. त्यावेळी युतीच्या काळात आनंद भोईर यांना सेवेत घेण्यासाठी सुरुवात झाली होती. पण काही कारणाने ती थांबली. मात्र, मे महिन्यात काही हालचाली होऊन पुन्हा आनंद भोईर (Anand Bhoir) यांना सेवेत घेतलं.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत आल्यानंतर आनंद भोईर यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत हालचाली सुरु झाल्या. भोईर यांच्या प्रकरणाची पुन्हा पुनरावलोकन करण्यात आले आणि स्थगिती उठवण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं असल्याचे समजते. तसेच, सध्या आनंद भोईर यांची नियुक्ती पूर्व विभागातील कंट्रोल रूममध्ये करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाच्या आदेशावरून आनंद भोईर यांना सेवेत घेण्यात आलंय असं वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितलं. याबाबत अधिक बोलण्यास वरिष्ठ अधिकार्‍याने नकार दिला आहे.

anti corruption | police inspector anand bhoir get job back after dismissed and commissioner of police opposed

काय आहे प्रकरण?

पोलीस निरीक्षक आनंद भोईर (Police Inspector Anand Bhoir) हे गुन्हे शाखेत (Crime Branch) सेवेत होते. त्यांनी अंधेरीच्या जेबीनगर मधील गोदामात छापा टाकला होता आणि 16.3 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर त्यांनी तेथील एकाला अटक देखील केली होती. यामध्ये त्यानं अशोक पटेलला (Ashok Patel) गोवण्याची धमकी दिली होती. तर अशोक पटेल यांची अटक टाळण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी भोईर यांनी केली. यावरून पटेल यांनी थेट ACB कडे तक्रार दाखल केली होती. नंतर, 22 लाखांची लाच घेताना भोईर हा ACB च्या जाळयात सापडला होता. त्याला अटक केली. हे प्रकरण अजूनही ACB कोर्टात प्रलंबित आहे.

लाचप्रकरणी भोईर याची चोकशी करण्यात आली. त्यावेळी तो दोषी निष्पन्न झाल्याने त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे (CP Sanjay Barve) यांनी 2019 मध्ये आनंद भोईर यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली. यावरून भोईर यांनी राज्याचे गृहराज्यमंत्र्यांकडे धाव घेतली. त्यांनी पोलिस आयुक्तांच्या (Commissioner of Police) आदेशाला स्थगिती देत पुन्हा सेवेत घेण्याचे निर्देश दिले. या निर्देशावरून आयुक्तांनी आक्षेप घेतल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांकडून स्वत:च्या आदेशाला स्थगिती देण्यात आली.

चौकशी दरम्यान, आरोपींना वाचवण्यासाठी आनंद भोईरने पैसे मागितल्याचं चौकशीत समोर
आलाय. नंतर भोईर यांच्यावर बडतर्फीची कारवाई केल्यांनतर भोईर यांनी गृह विभागाकडे (Home
Department) पुन्हा सेवेत घेण्यासाठी याचिका दाखल केली. यामध्ये भोईर यांनी सांगितलं होतं
की, ‘लाच घेताना अनेक सरकारी कर्मचारी पकडले गेलेत, आणि त्या सर्वांनाच सेवेतून काढून
टाकता येत नाही. तर लाच घेतली हे सेवेतून काढण्यासाठीचे कारण असू शकत नाही. मला
बेकायदेशीर सेवेतून काढून टाकलं आहे. म्हणत आपण संवेदनशिल प्रकरणांचा तपास केला असून
काम चांगलं असल्याचं देखील आनंद भोईर (Anand Bhoir) यांनी म्हटलं होतं.

हे देखील वाचा

Raghunath Yemul | कथित आध्यात्मिक गुरू रघुनाथ येमुल यास जामीन

Pune-Mumbai Highway | दोन भरधाव दुचाकी भुयारी मार्गात धडकल्या, अपघातात 2 युवकांचा मृत्यू

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  anti corruption | police inspector anand bhoir get job back after dismissed and commissioner of police opposed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update