Anti Corruption Pune | 1,10,000 ची लाचघेणारा हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात; पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Pune |गुन्हा दाखल न करण्यासाठी मदत करण्यासाठी एका हवालदाराने तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची मागणी करुन १ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Pune) सापळा रचून या हवालदाराला रंंगेहाथ पकडले. यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

दादासाहेब नामदेव ठोंबरे (वय ५०) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. दादासाहेब ठोंबरे हा बारामती तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Taluka Police) नेमणूकीला होता. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणाने तक्रार दिली आहे. मारहाणीच्या प्रकरणातून तक्रारदार तरुणाचे नाव कमी व त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी मदतीसाठी दादासाहेब ठोंबरे याने १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली. या तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Pune) धाव घेतली. त्यांनी केलेल्या पडताळणीत तोडजोड होऊन ठोंबरे याने १ लाख १० हजार रुपये घेण्याचे मान्य केले.

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (superintendent of police rajesh bansode), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (additional superintendent of police suraj gurav), अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा (additional superintendent of police suhas nadgouda) यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विजयमाला पवार (DySp Vijaymala Pawar), पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (Police Inspector Shriram Shinde) , पोलीस अंमलदार रतेश थरकार, अंकुश आंबेकर यांनी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दादासाहेब ठोंबरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. बारामती तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : Anti Corruption Pune | Havaldar of baramati taluka police station of pune rural police arrested while taking bribe of Rs 1,10,000 by anti-corruption

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Advt.

Latur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार

Lisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर,
अभिनेत्रीच्या एका शब्दाने केली बोलती बंद

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,479 नवीन रुग्ण,
तर 4,110 जणांना डिस्चार्ज

PIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना 1.30 लाख रुपये कॅश?
जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

Shirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत,
14 लाखाचा मुद्देमाल जप्त

Triple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ !
मोहिते-साठे गटात तुफान ‘राडा’