Pune Crime News : अँटी फंगल इंजेक्शनची काळया बाजारात विक्री

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – काळया बाजारात anti fungal अँटी फंगल anti fungal या साथीच्या आजारावरील इंजेक्‍शनची विक्री करणाऱ्या चौघांना पोलिसांनी वाकड येथे सापळा रचून पकडले. हि कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

गौरव जयवंत जगताप (वय ३१, रा. काळाखडक रोड, वाकड), अमोल अशोक मांजरेकर (वय ३९, रा. सूसरोड, पाषाण, पुणे), गणेश काका कोतमे (वय ३२, रा. जनता वसाहत, पुणे) आणि एक महिला आरोपी

(वय २४, रा. ज्ञानदीप शाळेजवळ, पालांडे यांच्या घरी, रुपीनगर, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी तर बसवराज (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद भाग्यश्री अभिराम यादव

(रा. धनकवडी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांना खबऱ्यांकडून वाकड येथे काही जण अँटी फंगल या साथीच्या आजारावर वापरण्यात येणारे

D Liposomol Amphoteriein-B Injection या औषधाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार गुंडा विरोधी पथकाने सापळा लावून चार जणांना अटक केली.

त्यांच्याकडून अँटी फंगलवरील इंजेक्‍शनचे तीन नग हस्तगत करण्यात आले.

त्यांनी हे औषध काळ्या बाजारात विक्रीसाठी आणले होते.

ही कारवाई गुंडा विरोधी पथकातील सहायक निरीक्षक हरीश माने, हजरत पठाण, गणेश मेदगे, शुभम कदम, राम मोहिते, विनोद तापकीर यांच्या पथकाने केली आहे.

Also Read This : 

 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

पालकचे सर्व आवश्यक न्यूट्रिशन कायम राखण्यासाठी ‘या’ 5 पद्धीने शिजवा आणि सेवन करा

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत

लठ्ठपणा ‘या’ 5 पध्दतीनं नियंत्रित करा, असंख्य गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो कमी, जाणून घ्या