भजन ‘सम्राट’ अनुप जलोटा यांच्या मातोश्री कमला जलोटा यांचे निधन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध भजन सम्राट अनुप जलोटा यांची आई कमला जलोटा यांचं निधन झालं आहे. कमला जलोटा या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. अद्याप याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही. या दुख:द बातमीनंतर जलोटा कुटुंबासोबतच एंटरटेंमेंट इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

एका ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत कमला जलोटा यांच्या निधनाची वार्ता देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “शोक संदेश | @HelpU_Trust के संरक्षक सुप्रसिद्ध भजन गायक पद्मश्री @anupjalota जी की माता जी श्रीमती कमला जलोटा जी का 85 वर्ष की उम्र में आज प्रातः मुम्बई में निधन हो गया | हमारे ट्रस्ट की ओर से मृतात्मा के प्रति विनम्र श्रद्धांजलि |” Help U Educational and Charitable Trust नावाने असणाऱ्या ट्विटर अकाऊंटवरून ही निधन वार्ता देण्यात आली आहे.

या ट्विटनंतर जलोटा कुटुंबासाठी ट्विटरवर अनेक शोकसंदेश येत आहेत. समोर आलेल्य माहितीनुसार, कमला जलोटा यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून खराब होती. अनुप जलोटा नकुतेच अमेरिकेतून परत आले. त्यांनी ऋषी कपूर आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनी काही दिवसांपूर्वीच रिअॅलिटी शो बिग बॉस 12 मध्ये आपली शिष्या जसलीन मथारू सोबत एन्ट्री घेतली होती. यचा दोघांच्या जोडीची खूपच चर्चा होताना झाली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like