Coronavirus : अनुपम खेरच्या कुटुंबाला देखील ‘कोरोना’, आई आणि भावासह 4 जण पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अभिनेता अनुपम खेर यांची आई आणि भावासह कुटुंबातील 4 जण कोरोना संक्रमित आढळले आहेत. अनुपम खेर यांनी रविवारी सकाळी ट्विट करून ही माहिती दिली.

अनुपम यांनी व्हिडिओमध्ये सांगितले की, काही दिवसांपासून त्यांच्या आईची प्रकृती बिघडली होती. त्यांना काही दिवसांपासून भूक लागत नव्हती, आणि त्या सतत झोपून राहात होत्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांनी आपल्या आईची ब्लड टेस्ट केली, ज्यामध्ये सर्वकाही ठिक होते. नंतर सीटी स्कॅन केले आणि नंतर कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

यानंतर अनुपम आणि त्यांचे भाऊ राजू यांनी सुद्धा कोरोना टेस्ट केली. रिपोर्टमध्ये अनुपम निगेटिव्ह आढळले तर त्यांचा भाऊ पॉझिटिव्ह आढळला आहे, टेस्ट रिझल्ट माइल्ड कोविड-19 आला आहे. यानंतर राजू यांच्या फॅमिलीची सुद्धा कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये अनुपम यांची वहिणी आणि पुतणी वृंदा माइल्ड कोरोना पॉजिटिव्ह आढळल्या, तर पुतण्या निगेटिव्ह आहे.

सध्या अनुपम यांनी सांगितले की, त्यांची आई कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅटमिट आहे. याबाबत बीएमसीला सुद्धा सूचना दिली आहे. आता त्यांचे घर सॅनिटाइज केले जाईल. अनुपम यांनी लोकांनाही आवाहन केले की, आपल्या आई-वडीलांची काळजी घ्या. त्यांनी डॉक्टरांचे सुद्धा कौतूक केले, जे रात्रंदिवस काम करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like