टक्कल असण्याचं दु:ख जाणतात अनुपम खेर, सोशलवर शेअर केलं मजेदार गाणं (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून जगभरातील टक्कल असणाऱ्या लोकांसाठी एक गाणं समर्पित केलं आहे. व्हिडीओ शेअर करताना अनुपम खेर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “जगभरातील टकल्या लोकांसाठी माझं हे भावपूर्ण गाणं समर्पित.” हॅशटॅगमध्ये त्यांनी मंडे मोटीवेशन म्हटलं आहे.

अनुपम खेर यांनी ट्विटरवरून शेअर केलेल्या व्हिडीओत ते ते गाणं गाताना दिसत आहेत. व्हिडीओत अनुपम खेर म्हणतात, “मी तुम्हाला टकल्या माणसांचं आवडतं गाणं ऐकवतो. ऐ मेरे बिछड बालो, फिर से उग आओ सालो, तुम पे मैं कुर्बान, जुल्म के पंजों में हू, मै भी अब गंजों में हूं, सिर हुआ विरान.”

पुढे ते म्हणतात, “आंखो और माथे पर कैसे झट से गिर जाते थे तुम, जब बिखरते थे अदाएं कितनी बिखराते थे तुम, सुना ये सर कर गए, तुम तो कब के झड गए, रह गए दो कान.”

सध्या अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. अद्याप हजारो लोकांनी त्यांचा हा व्हिडीओ पाहिला आहे. काहींनी कमेंट करत यावर आपली प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

अनुपम यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर एनबीसीवर येणारा ड्रामा न्यू एम्स्टर्डम मध्ये ते डॉ विजय कपूरची भूमिका साकारत आहेत. एमएक्स प्लेअरवरील सिनेमा रक्तांचलमध्येही ते काम करताना दिसणार आहेत.