Anushka Sharma | अनुष्का शर्माचा देसी एयरपोर्ट लूक होतोय व्हायरल; नेटकऱ्यांना आवडला अंदाज

पोलीसनामा ऑनलाइन – Anushka Sharma | बॉलीवुड अभिनेत्री आपल्या फॅशनने सोशल मीडियावर आग लावत असतात. अनेक बॉलीवुड अभिनेत्रींचे खास एअरपोर्ट लूक खूप लोकप्रिय होत असतात. अनेक अभिनेत्री या त्यांच्या खास एयरपोर्ट लूक (Bollywood Celebrity Airport Look) साठी नावाजल्या जातात. यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचे एयरपोर्ट लूक हे खूप ट्रेंडमध्ये असतात आणि तरुणींना आकर्षित करतात. पण सध्या अभिनेत्री अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) एयरपोर्ट लूकची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आपल्या हटके फॅशनने सर्वांना अवाक करणाऱ्या अनुष्काने यावेळी मात्र सिंपल अनारकली स्टाईल केला होता. तिच्या या देसी एअरपोर्ट लूकची सर्वत्र चर्चा आहे.

बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही अनेकदा तिच्या फॅशनने व अदांनी चाहत्यांना घाय़ाळ करत असते. काही वर्षापासून चित्रपटांमध्ये न झळकणारी अनुष्का ही आजही सतत चर्चेत असते. नुकतीच ती एयरपोर्टवर स्पॉट झाली. मात्र यावेळी तिने अगदी साधा व सिंपल लूक क्रिएट केला होता. अनुष्काने व्हाईट व पिंक कलरचा अनारकली सूट सेट परिधान केला होता. ओढणी घेऊन आणि केस मोकळे सोडून तिने स्टाईल केली होती. यावेळी अनुष्काने पापाराझींना फोटोसाठी पोज देखील दिल्या. तिच्या या देसी एयरपोर्टलूकमध्ये सर्वात आकर्षक तिची झोला स्टाईल बॅग दिसत होती. तिने पांढऱ्याच रंगाची मोठी झोला बॅग कॅरी केली होती. अभिनेत्री अनुष्का शर्माचा हा लूक (Anushka Sharma Airport Look) सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने बॉलीवुडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिने बॅंड बाजा बरात (Band Baaja Baaraat), रब ने बना दी जोडी (Rab Ne Bana Di Jodi), सुलतान (Sultan), पीके (PK), सुई धागा (Sui Dhaaga), ये दिल हैं मुश्किल (Ae Dil Hai Mushkil) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. पण मागील काही दिवसापासून तिने चित्रपटांपासून ब्रेक घेतला असून ती मुलगी वामिकाचा (Vamika Kohli) सांभाळ करत आहे. ती शेवटची लग्नाआधी 2018 साली आलेल्या ‘झिरो’ चित्रपटात (Zero Movie) झळकली होती. आता अनुष्का ‘चकड़ा एक्सप्रेस’ (Chakda Xpress) या चित्रपटामध्ये झळकणार आहे. हा चित्रपट महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांच्या आयुष्यावर आधारित जीवनपट असणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी