Coronavirus : ‘कोरोना’चा ‘कहर’, पत्नी, मुलांपासून वेगळा झाला न्युझीलंडचा माजी क्रिकेटर, भेटण्यासाठी मागतोय मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज इयान ओ ब्रायन ग्रेट संकटात असून त्यांना आपल्या कुटुंबाला भेटायचे आहे. इयान यांचे कुटुंब ब्रिटनमध्ये राहत असून तिकडे जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. त्यामुळे ते देणगी मागण्यास मजबूर झाले आहेत.

त्यांना आपल्या कुटुंबाला भेटायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर लोकांकडे मदतीची मागणी केली आहे. ट्विटरवर त्यांना कुटुंबाला भेटण्यासाठी लागणारे पैसे जमा करण्याची इच्छा आहे. घरातल्यांना भेटण्यासाठी ते देणगी जमा करत असून ते हे विनामूल्य करू इच्छित नाहीत.

न्यूझीलंडसाठी २२ टेस्ट आणि १० वनडे खेळलेल्या माजी वेगवान गोलंदाजाचे म्हणणे आहे की, ते व्हिडिओ कॉल द्वारे क्रिकेटबाबत बोलायला तयार असून याबदल्यात त्यांना पैसे हवे आहेत. या व्हिडिओ कॉलने जो पैसे त्यांना मिळणार आहे तो पैसा ते ग्रेट ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी वापरणार आहेत. इयान यांची पत्नी आणि त्यांची दोन छोटी मुले त्यांच्यापासून लांब राहतात.

कोरोना व्हायरसचा धोका सध्या संपूर्ण जगात पसरला आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलिया दौरा मध्यभागी रद्द करावा लागला. तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रिकाम्या स्टेडियमवर झाला. यानंतर दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डने परस्पर सहमतीने मालिकेचे उर्वरित दोन सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियामधून परत आल्यानंतर सर्व खेळाडू आणि संघातील प्रशिक्षक कर्मचारी यांना क्वारंटाइन मध्ये ठेवण्यात आले होते.