Apla Pune Cyclothon | पुनीत बालन ग्रुप आपलं पुणे सायक्लोथॉन रविवारी (5 मार्च)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Apla Pune Cyclothon | पुणे शहराची सायकलींचे शहर अशी ओळख जपत भारतातील आघाडीची राष्ट्रीय स्तरावर मॅरेथॉन, ट्रायथलॉन्स व सायक्लोथॉनस आयोजित करणारी क्रीडा संयोजक संस्था चॅम्प एन्ड्युरन्स ने पुणेकरांना सायकलच्या पेडल्सवर आणण्यासाठी ‘आपलं पुणे सायक्लोथॉन’चे (Apla Pune Cyclothon) आयोजन केले आहे. पुणे सायक्लोथॉनचे यंदाचे दुसरे वर्ष असून पुनीत बालन टायटल स्पॉन्सर (Punit Balan Group) असलेल्या फिनोलेक्स पाईप्स च्या सयुंक्त विद्यमाने येत्या रविवारी ०५ मार्च रोजी पहाटे ५ वाजल्यापासून शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथून सायक्लोथॉन ला सुरुवात होणार आहे. आपले बीब आणि कीट स्पर्धकांनी डीकॅथलॉन,व्हिजन मॉल वाकड येथून ०४ मार्च रोजी सकाळी १०:३० ते संध्याकाळी ७:०० दरम्यान कलेक्ट करण्याची विनंती करण्यात आली आहे. फ्लॅग ऑफ रविवारी पहाटे ५:०० वाजता होणार आहे.

 

१०, २५, ५० व १०० अशा ४ अंतरांसाठी हि स्पर्धा असणार आहे. १० किलोमीटर अंतराचे नाव जॉय राईड, स्त्रियांच्या २५ किलोमीटर अंतरासाठी पिंक पेडलिंग असे नाव आहे. पुरुषांसाठी ३ वेगवेगळे २५, ५० व १०० किलोमीटरचे पल्ले असणार आहेत. (Apla Pune Cyclothon)

 

प्रत्येक स्पर्धकास सायकलिंग जर्सी, स्लिंग बॅग, आकर्षक बक्षिसे व स्पर्धेदरम्यान हायड्रेशन सपोर्ट मिळणार आहे
तसेच यशस्वीपणे अंतर पार करणाऱ्या स्पर्धकांना फिनिशर्स मेडल्स सुद्धा मिळणार आहेत.
पुण्याला पुन्हा एकदा सायकलींच शहर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी सहभागी व्हावे
अशी विनंती चॅम्प एन्ड्युरन्सकडून करण्यात आली आहे.

 

Web Title :- Appla Pune Cyclothon | Punit Balan Group Aplam Pune Cyclothon Sunday (March 5)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravichandran Ashwin | रविचंद्रन अश्विनने मोडला कपिल देवाचा तो रेकॉर्ड; ‘हा’ कारनामा करणारा ठरला तिसरा खेळाडू

Kasba Bypoll Election Result | भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

Uddhav Thackeray | भाजपची निती वापरा आणि फेका, पोटनिवडणुकीच्या निकालावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात (व्हिडिओ)