Uddhav Thackeray | भाजपची निती वापरा आणि फेका, पोटनिवडणुकीच्या निकालावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) प्रतिष्ठेची केलेली आणि अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Pune Kasba Peth Bypoll Election) निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी चेभाजप हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभाव केला. या निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला.

वापरा आणि फेका हीच भाजपची निती राहिली आहे. कसब्यात टिळकांच्या घराण्याला आणि गोव्यात पर्रिकरांच्या (Manohar Parrikar) मुलाला भाजपनं टाकलं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर केली आहे. तसेच कसब्यातील महाविकास आघाडीच्या विजयावर बोलताना, लोक आता वेगळा विचार करु शकतात हे या निकालावरून समोर आल्याचे त्यांनी सांगितलं.

भाजपची निती नेहमीच वापरा आणि फेका अशीच राहिली आहे हे मी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा म्हटलं होतं. कसब्यात टिळकांच्या घराण्याला उमेदवारी दिली नाही. भाजपनं टिळकांच्या घराण्याला टाकले. तर गिरीश बापट (Girish Bapat) यांची तब्येत ठिक नसतानाही त्यांना प्रचारात उतरवलं. गोव्यातही मनोहर पर्रिकरांबाबत तेच केलं. पण त्यांच्या पश्चात मुलाला भाजपने बाजूला केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

भाजप विरोधातील मतं एकत्र करण्याची गरज

कसबा पेठ निकालाने लोक वेगळा विचार करु शकतात हे दाखवून दिले आहे.
चिंचवडमध्येही भाजप विरोधातील मतं पाहिली तर तिथंही आज भाजपविरोधात निकाल लागला असता.
भाजप विरोधातील मतांना एकत्र कसं करता येील हाच मोठा प्रश्न असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray attacks bjp over bypoll result in kasba pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election Result | कसबा भाजपच्या हातून निसटला, काँग्रेसने गुलाल उधळला; जाणून घ्या कोणाला किती मते पडली

Nashik Crime News | भीषण अपघातात दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमधील घटना

Supreme Court | मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल, समिती नेमण्याचे आदेश