खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मंजुरी ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी (दि. 20) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच, कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यासाठी कापूस पणन महासंघाला बँकाकडून कर्ज घेण्यास 1500 कोटीची शासन हमी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कापूस शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
1) कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यासाठी कापूस पणन महासंघाला बँकाकडून कर्ज घेण्यास 1500कोटीची शासन हमी
2) राज्यात शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा निर्णय
3)खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मान्यता