CamScanner नं आणली अनेक नवे ‘फिचर्स’, ‘PPT’ पासून ‘स्प्रेड शिट’चा पर्याय उपलब्ध, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – CamScanner अॅप अॅण्ड्राइड आणि आयओएस यूजर्समध्ये कागदपत्र स्कॅन करुन ठेवण्यासाठीच्या सेवेमुळे पसंदीचे आहे. यात तुम्ही कोणत्याही प्रकारची कागदपत्र स्कॅन करुन ठेवू शकतात. आता कंपनीने ग्राहकांना नवी सेवा अॅड करुन दिली आहे. या फिचरमुळे वापरकर्ते आपली कागदपत्र कायम हाय क्वॉलिटी स्कॅन करुन नवी ठेवू शकतात असा पर्याय दिला आहे.
1. इमेजपासून स्प्रेडशीट – वापरकर्ता आता कोणत्याही कागदपत्रांचा फोटो काढून त्या दरम्यान स्प्रेडशीटमध्ये बदलू शकतील.
2. बुक पासून ई बुक – आता वापरकर्ता पुस्तकाचे फोटो क्लिक करुन त्याला स्कॅन करुन ठेवू शकतात. या फिचरमुळे पुस्तकाची पाने उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे उलगडू शकतात. त्यामुळे स्कॅन वाचताना वापरकर्ते पुस्तकाचा अनुभव घेऊ शकतील.
3. पॉवर प्वाइंट प्रेजेंटेशनला देखील स्कॅन करा – PPT शूटिंग मोडमध्ये यूजर्स प्रेजेंटेशनला स्कॅन करण्याची सुविधा देत आहे. यात कॉर्नर्समध्ये देखील यूजर्सला पूर्णता स्पष्ट दिसेल.
4. तुमचे सर्टिफिकेट प्रिंट करा – आता तुम्ही तुमचे सर्टिफिकेट स्कॅन करुन शकतात आणि त्याचे प्रिट Ready views पाहू शकतात.
5. सर्च करा आणि भाषांतर करा – स्मार्ट ऑप्टिकल कॅरेक्टर रिकॉग्निशन (ओसीआर) च्या माध्यमातून यूजर्स स्कॅन केलेल्या कागदपत्रातील कोणताही टेक्स्ट शोधू शकतात आणि त्यातून तुम्ही 60 पेक्षा जास्त भाषामध्ये भाषांतर करु शकतात.
हे सर्व फीचर आज पासून VIP अकाऊंटसाठी उपलब्ध आहेत. ज्यांच्याकडे हे VIP अकाऊंट आहे, ते फ्रीमध्ये 10 GB क्लाऊंड स्पेसमध्ये डाक्यूमेंट्स ठेवू शकतात.
कंपनीच्या मार्केटिंग डायरेक्टरने सांगितले की, भारत जेथे वेगाने डिजिटलायजेशनकडे वाटचाल करत आहे, कंपनी सुनिश्चित करते की लोकांना सरळ आणि संपूर्ण मोबाइल स्कॅनरचे समाधान मिळेल. ज्यातून वापरकर्ते विविध कागदपत्र स्कॅन करु शकतील आणि शेअर देखील करु शकतील. CamScanner 200 पेक्षा अधिक देशात आहे, त्यात 37 कोटी रुपयांपेक्षा जास्त डिवाइसेज इंस्टॉल करण्यात आले आहेत. रोज याचे 50,000 पेक्षा जास्त इंस्टॉलर आहेत.