इंस्टाग्राम बंद करणार ‘हे’ फिचर, युजर्सला भेडसावू शकतात ‘या’ समस्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फोटो शेअरिंगसाठी तरुणाईमध्ये प्रसिद्ध असलेले इंस्टाग्रामची लोकप्रियता वाढत चालली असल्यामुळे ते अनेक नवनवीन फिचर आणत होते. मात्र सध्या इंस्टाग्रामने आपल्यातील एक फिचर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इंस्टाग्रामधील फॉलोईंग ही टॅब आता काढून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर युजर्सला त्याचा वापर करता येणार नाही.

इंस्टाग्रामचे प्रॉडक्ट हेड विशाल शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार इंस्टाग्रामवरून फॉलोईंग हे टॅब काढण्यात आले आहे. इंस्टाग्राम वापरकर्त्यांमध्ये हे खूप महत्वाचे फिचर होते. ज्यामुळे इंस्टाग्रामवरील आपल्या मित्रांची अ‍ॅक्टिव्हिटी पाहता येत असे. आपण ज्या मित्राला फॉलो केले आहे त्याने कोणती पोस्ट लाईक केली किंवा नवीन काय अपडेट केले याची माहिती या टॅबद्वारे मिळत असे. मात्र आता हे फिचर बंद केल्यामुळे तुम्हाला मित्राच्या अ‍ॅक्टिव्हिटीची माहिती मिळणार नाही.

2011 मध्ये फॉलोईंग टॅब या फीचरला सुरुवात करण्यात आली होती. युजर्सला आपल्या फॉलो करत असलेल्या मित्राची अ‍ॅक्टिव्हिटी पाहता यावी हा त्या मागचा हेतू होता. काही दिवसांपूर्वी कंपनीने ग्लोबली रिस्ट्रिक्ट फीचरला रोल आऊट केले आहे. एखाद्या पोस्ट वर येणाऱ्या अपमानजनक कमेंट रोखण्याचे काम हे फिचर करते.

नुकतेच इंस्टाग्रामने डार्क मोड फिचर सुरु केले होते. तसेच शॉपिंगसाठीच्या आर्टिफिशल इंटेलिजन्स फीचरला सुरुवात केली आहे ज्याद्वारे एखादे प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी कृत्रिमरीत्या ट्राय करता येणार आहे.

Visit : Policenama.com