मलायकासोबतच्या घटस्फोटाबाबत २ वर्षांनी अरबाजची पहिलीच प्रतिक्रिया… केला मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मलायका अरोरा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या आणि अर्जुन कपूरच्या लग्नाला घेऊन ती चर्चेत आहे. दरम्यान या सगळ्यात अनेकदा तिचा पती अरबाज खानचे अनेकदा नाव आले आहे. अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाला २ वर्षे होऊनही अरबाजने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्याने आता पहिल्यांदाचा याबाबत भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या घटस्फोटाबाबत त्याने आता खुलासा केला आहे.

एका टॉक शो मध्ये बोलताना अरबाज खानने त्याच्या आणि मलायकाच्या नात्याबद्दल सांगितले आहे. यावेळी बोलताना अरबाज म्हणाला की, “सर्व काही ठिक वाटत होतं. परंतु तरीही आमचा घटस्फोट झाला.” असे अरबाजने सांगितले. तू इतरांना लग्नाचा सल्ला देणार का? असा प्रश्न विचारल्यावर अरबाज म्हणाला की, “हो. मी लग्नासाठी नक्कीच सल्ला देईन. लग्न आजच नाही तर गेल्या कित्येक वर्षापासून चालत आलेली प्रथा आहे. जोपर्यंत काही ठिक होत नाही तोपर्यंत आपल्याकडून सर्व काही ठिक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” असेही अरबाज यावेळी म्हणाला.

अरबाज आणि मलायका ही बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारी जोडी होती. परंतु लग्नाच्या 18 वर्षांनंतर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि ते वेगळे झाले आहेत.

You might also like