अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएलाचा VIDEO VIRAL, पहा गॅब्रिएलाचा घायाळ करणारा कटाक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड( Gabriella Demetriade) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. गॅब्रिएला लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून ती चर्चेत आहे. याआधीही अर्जुन आणि गॅब्रिएलाचा एक फोटो समोर आला होता. तो फोटो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला होता. ता पुन्हा एकदा हे स्वीट कपल चर्चेत आलं आहे. अर्जुन आणि गॅब्रिएलाचा फोटो एक व्हिडीओ समोर आला आहे. दोघेही एका ज्यूस बारच्या बाहेर स्पॉट झाले आहेत.

गॅब्रिएला खूपच क्युट दिसत आहे. बेबी बंप आणि तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नंसीचा ग्लो विशेष हायलाईट होताना दिसत आहे. ज्यूस बारच्या बाहेर पडताच दोघांनाही पैपराजी आणि फॅन्सने घेरल्याचे दिसत आहे. ग्रॅबिएलाने गाडीत बसताना मागे वळून खूपच घायाळ करणारा कटाक्ष टाकला आहे. गॅब्रिएलाने स्लीव्हलेस व्हाईट टीशर्ट तर अर्जुनने ब्लॅक टीशर्ट आणि गॉगल घातल्याचे दिसत आहे. एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून सध्या हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

काही दिवसांपू्र्वी अर्जुनने त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड( Gabriella Demetriade) हिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तेही खूप व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये गॅब्रिएला प्रेग्नंट असल्याचे स्पष्ट दिसत होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते की, “तू माझ्या आयुष्यात आलीस आणि या नव्या सुरुवातीमुळे मी फार आनंदी आहे. या बाळासाठी धन्यवाद.” असे अर्जुनने आपल्या प्रेयसीचे आभार मानले होते.

अर्जुनला त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीपासून दोन मुली आहेत. माहिका आणि मायरा अशी त्यांची नावे असून मेहर असं त्याच्या आधीच्या पत्नीचं नाव आहे. त्यामुळे आता अर्जुन तिसऱ्यांदा बाबा होणार आहे असे दिसत होते. अर्जुन येणाऱ्या बाळासाठी खूपच खुश असल्याचे दिसत होतं. अर्जुनने शेअर केलेल्या फोटोवरून स्पष्ट दिसत होतं की, कदाचित त्याने मॅटर्निटी फोटोशुट केलं आहे.

कोण आहे गॅब्रिएला डेमेट्रिएड ?

गॅब्रिएला ही दक्षिण आफ्रिकेची मॉडेल आहे. दरम्यान गॅब्रिएला ही काहि सिनेमांमध्ये आणि म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे. तिला खरी ओळख मिस IPL बॉलिवूड हा किताब जिंकल्यानंतर झाली. 2009 मध्ये तिने मिस इंडियन प्रिमिअर लीगमध्ये भाग घेतला होता त्यानंतर एफएचएमच्या जगातील 100 मादक महिलांमध्ये तिची निवड झाली.