गणेश भक्तांसाठी पार्कींगची व्यवस्था

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. गणेश मंडळांनी उभारलेले देखावे, रोषणाई पाहण्यासाठी नागरीक मोठ्या प्रमाणात येत असतात. नागरिकांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा तसेच नागरिकांना आपली वाहने सुरक्षीत पार्क करता यावी यासाठी वाहतूक शाखेकडून पार्कींगची व्यवस्था केली आहे. तसेच मध्यवस्तीतील रस्त्यांवर वाहने आणण्यास बंदी घालण्यात आली असून तसेच रस्त्यांच्या आजूबाजूला वाहने पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाहन पार्कींगसाठी मनाई करण्यात आलेले रस्ते
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca5f358d-b98b-11e8-b986-1dec357881cd’]

१ ) गाडगीळ पुतळा ते राष्ट्रभुषण चौक – शिवाजी रोड २) राष्ट्रभुषण चौक ते हिराबाग चौक (खडकमाळ आळीरोड) ३) पुरम चौक ते गाडगीळ चौक – बाजीराव रोड. या रस्त्यांवर वाहने पाकर्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत भाविकांनी त्यांची वाहन पार्क करण्यासाठी खालील प्रमाणे पार्किंग ठिकाणांची सुविधा करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B07811Y98Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea774e3d-b98b-11e8-8261-8b36d6116c63′]

२ ) विमलाबाई गरवारे कॉलेज, कर्वे रोड २) एच.व्ही. देसाई कॉलेज, मनपा विद्यालय, विश्रामबाग ३) पुलाची वाडी – नदी किनारी  ४) पुरम चौक ते हॉटेल विश्व – रस्त्याचे डावे बाजूस ५) दारुवाला पुल ते खडीचे मैदान  – गणेश रोड ६) गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस चौक ७) काँग्रेस भवन – मनपा रोड ८) सर्कस मैदान ९) व्होल्गा चौक ते मित्र मंडळ चौक, कॅनॉलचे कडेस बाजी पासलकर पथ १०) टिळक पुल ते भिडे पुल – नदी किनारी ११) बालभवनसमोर- सारसबाग रोड बजाज पुतळा ते सणस पुतळा चौक उजवी बाजू १२) हमालवाडा पार्कींग – नारायणपेठ या ठिकाणी भक्तांनी आपली वाहने पार्क करावीत. तसेच समोवार (दि.१७) ते शनिवार (दि.२२) या कालावधीत गणेश मंडळांनी केलेल देखावे पाहण्यासाठी होत असलेली गर्दीमुळे शिवाजी रोडवर चारचाकी वाहनांना व पीएमपीएणएल बसेसला प्रवेश बंद असणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पॉवर हाऊस चौक ते बाहुबली चौक या परिसरात रस्त्यांच्या पुर्व बाजूस सर्व वाहनांना पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे.