सावधान ! नवजात बालकांची विक्री करणारी टोळी गजाआड

चेंबुर (मुंबई) : पोलीसनामा ऑनलाइन – दत्तक देणे-घेण्याच्या नावाखाली नवजात बालकांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळाला गजाआड करण्यात आले आहे. पोलिसांनी टोळीने विक्री केलेल्या ३ वर्ष आणि ३ महिन्यांच्या बालकांचा शोध घेऊन त्यांना बालसुरक्षागृहामध्ये ठेवण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी (दि.२९) गुन्हे अन्वेशण विभागाच्या कक्ष-६ च्या पथकाने मानखुर्द, कुर्ला, कल्याण परिसरात केली. या कारवाईत पोलिसांनी ५ महिलांसह १ व्यक्तीला अटक केली आहे.

काही महिला आपल्या आर्थीक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे नवजात बालकांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत दळवी यांनी मिळाली. मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी एक पथकाने मानखुर्द येथील साठे नगर परिसरात चौकशी केली. त्यावेळी एका महिलेकडे चौकशी कली असता त्याच परिसरात राहणाऱ्या दोन महिला असाह्य व आर्थीकदृष्ट्या दुर्बल महिलांना हेरून त्यांची मुले कायदेशीर दत्तक घेऊन तसेच भविष्यात मुलांना भेटण्याची इच्छा झाल्यास मुलांना भेटता येईल असे आमिष दाखूव नवजात बालके घेऊन त्यांची विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ही टोळी मानखुर्द, कुर्ला, कल्याण व इतर परिसरात कार्यरत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी महिलांचा शोध घेऊन आत्तापर्य़ंत ५ महिला आणि १ व्यक्तीला मानखुर्द, कुर्ला, कल्याण आणि ठाणे येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी नवजात बालकांची दोन ते चार लाख रुपयांना विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी विक्री केलेल्या बालकांचा शोध घेऊन ३ वर्षाच्या एका मुलाचा आणि ३ महिन्याच्या मुलाचा शोध घेऊन त्यांना बालसुरक्षागृहात ठेवले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एका महिलेला २०१६ मध्ये मुलांची चोरी केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. सध्या ती महिला जामीनावर आहे. नवजात बालकांची चोरी किंवा विक्री झालेल्याची माहिती असल्यास त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त (प्रगटीकरण-१) अकबर पठाण सहायक पोलीस आयुक्त शेखर तोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसन निरीक्षक आबुराव सोनावणे, महिला पोलीस निरीक्षक अर्पणा जोशी, चंद्रकांत दळवी, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, महेश तोरस्कर, अनिल गायकवाड, पोलीस उप निरीक्षक योगेश लामखडे, रामचंद्र इंदुलकर, महिला कर्मचारी स्नेहा नाईक, प्राची मुळीक, शितल पुजारी, निधी धुमाळ, अनिता सिंग-पावर, पोलीस कर्मचारी सुरेश पवार, कांता गायकवाड, जयवंत संकपाळ, रमेश जाधव, मनोहर भोसले, आशोक आंब्रे, देवेंद्र राणे, नितीन सावंत, सुर्य़कांत शिर्के, महादेव कुरळे, संजय गायकवाड, संजय तोंडबळकर, उज्वल सावंत, तुषार चव्हाण, विजय भिलारे, धनंजय शिंदे, नरेश हडकर, सुरेश घेरडे, संभाजी कोळेकर, अमोल इंगळे, सुनिल पाटील, वसंत डाळे, गणेश कदम, गोकुळ जायभाय, नितीन चौधरी यांच्या पथकाने केली.

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ही काळजी

‘वंचित’मुळे राहूल गांधींची कॉंग्रेस नेत्यांवर ‘आगपाखड’