Arrest In MPID Case – Pune Crime | जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन कोट्यावधींची फसवणूक करणार्‍या मुख्य आरोपी नादीर अब्दुल हुसेन नाईमआबादी व रोया उर्फ सीमा नाईमआबादी यांना अटक; समर्थ पोलिसांची कामगिरी

पुणे : Arrest In MPID Case – Pune Crime | जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या मुख्य आरोपीसह दोघांना समर्थ पोलिसांनी (Samarth Police) अटक केली आहे. अब्दुल हुसेन हसनअली नईमआबादी (Abdul Hussain Hasan Ali Naeemabadi) व रोया ऊर्फ सीमा अब्दुल हुसेन नईम आबादी Roya alias Seema Abdul Hussain Naeem Abadi (वय ३५, रा. कॅम्प) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Arrest In MPID Case – Pune Crime)

सीमा नईमआबादी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते मिळून येत नव्हते. आरोपींना ३१ डिसेंबर २०२३ रोजी विशेष न्यायाधीश एस .जी .वेदपाठक कोर्टासमोर हजर करण्यात आले. फिर्यादी तर्फे वकील अमेय सिरसीकर (Adv Amey Sirsikar) यांनी कोर्टास निदर्शनात आणून दिले की अटक आरोपी व फरार आरोपी यांनी संगणमत करून फिर्यादी व इतर गुंतवणूकदार यांना चांगल्या परदाव्याचे आमिष दाखवून त्यांना परतावा न देता फिर्यादीची व इतर गुंतवणूकदारांची दोन कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपींनी हे पैसे कशासाठी वापरले, कुठे व कसे पाठवले व्यवहाराची पैशाची साखळी कुठे व कशी आहे याचा तपास करणे आवश्यक आहे. पैशाचा शोध घेणे बाकी आहे त्याकरिता पोलिसांना आरोपीची पोलीस कस्टडी मिळणे आवश्यक आहे असा युक्तिवाद केला. (Arrest In MPID Case – Pune Crime)

कोर्टाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कस्टडी मध्ये पाठवण्याचा निर्णय करत असे म्हटले की, अटक आरोपी व फरार आरोपी यांचा एकमेकांसोबत संगणमत आहे व गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे. पैशाची रिकवरी करणे बाकी आहे, इतर आरोपींचा गुन्ह्यातील संबंध व सहभाग याचा तपास करणे बाकी आहे, फिर्यादी यांची दोन कोटी चाळीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याकरिता पाच दिवसाची न्यायालयीन कस्टडी मिळणे आवश्यक आहे असे रिमांड ऑर्डर मध्ये म्हणाले. (Arrest In MPID Case – Pune Crime)

याप्रकरणात समर्थ पोलिसांनी नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमा आबादी (रा. सिनागग ईस्ट्रीट, कॅम्प), रोया उर्फ सीमा नादीर नईमा आबादी (वय ३५, रा. कॅम्प), मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), माजीद उस्मान आत्तार (रा. बोपोडी), खालीद मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), इरम शोऐब आत्तार (रा. बोपोडी) यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमन १९९९ चे कलम ३ चा अंतर्भाव (MPID Case) करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत रास्तापेठ येथे घडला. याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतिफ (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी मौलाना शोएब व नादीर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपींनी संगनमत करुन त्यांचा कोणताही इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय नसताना या व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले. त्यावर विश्वास ठेवून शेख यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे २ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा न देता फसवणूक केली होती.

याप्रमाणेच या आरोपींनी आणखी तिघांची फसवणूक केल्याचे गुन्हे गेल्या ४ महिन्यांमध्ये तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
या चार गुन्ह्यांमध्ये एकू ६ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी या आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश वेगवेगळ्या तपास यंत्रणेला दिले होते.
समर्थ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सौरभ थोरवे व पोलिस अंमलदार हेमंत पेरणे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन
या दोघांचा ठावठिकाणी कॅम्पमध्येच असल्याचे शोधून काढले व त्यांना अटक केली.
त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह आयुक्त (अति.कार्य) आणि
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील
(IPS Pravinkumar Patil),पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल (IPS Sandeep Singh Gill),
सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ (ACP Ashok Dhumal), समर्थ पोलिस ठाण्याचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश बंडगर (Sr PI Suresh Bandgar), पोलिस निरीक्षक ( गुन्हे) प्रमोद वाघमारे
(PI Pramod Waghmare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सौरभ थोरवे, ज्योती कुटे,
पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, सहायक फौजदार दत्तात्रय भोसले, हवालदार संतोष डमाळे, नीलम करपे, गणेश वायकर,
प्रमोद जगताप, शरद घोरपडे, प्रफुल्ल साबळे, सीमा गायकवाड, स्वाती भालेराव यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

तरुणाला मारहाण करुन गाडी घेण्यासाठी साठवलेले पैसे आणि आयफोन हिसकावला, चिखली येथील प्रकार

Hit and Run Law | हीट अँड रन : वडेट्टीवार यांचा आरोप, अधिकाऱ्यांना पुढे करून जनतेच्या रोषापासून वाचण्याचा सरकारचा प्रयत्न

Raju Shetty | मोतोश्रीवरील भेटीनंतर राजू शेट्टी म्हणाले, ”जागावाटपाची चर्चा नाही, आम्हाला अदानींचा त्रास म्हणून…”

दाम्पत्याला शिवीगाळ करुन घरावर दगडफेक, कोंढवा परिसरातील घटना