Pune Pimpri Chinchwad Crime News | तरुणाला मारहाण करुन गाडी घेण्यासाठी साठवलेले पैसे आणि आयफोन हिसकावला, चिखली येथील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणांना अडवून त्यांच्याकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. तरुणांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चार ते पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण (Beating) करुन गाडी घेण्यासाठी साठवलेले 35 हजार रुपये व आयफोन (iPhone) जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी चिखली पोलिसांनी (PCPC Police) दोघांना अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.31 डिसेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत अरबाज फिरोज पठाण (वय-18 रा. तिरंगा हौसिंग सोसायटी, अजंठानगर, चिंचवड) याने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पवन (वय-19), शिवांग (वय-19 दोघे रा. भिमशक्ती नगर, चिखली) यांच्यासह इतर दोन साथीदारांवर आयपीसी 394, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करुन पवन आणि शिवांग यांना अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी व त्याचा मित्र श्रेयस पिसाळ हे
दुचाकीवरुन आंगणवाडी रोडने रुपीनगर तळवडे येथे घरी जात होते. त्यावेळी अरबाज याचे मित्र आरोपी पवन व शिवांग
यांनी आवाज दिल्याने तो थांबला. आरोपींनी त्याच्याजवळ येऊन दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली.
त्यावेळी अरबाजने माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी अरबाज आणि श्रेयस याला शिवीगाळ करुन दुचाकीची चावी काढून घेतली.

आरोपींनी त्यांच्या इतर दोन साथीदारांना बोलवून घेतले. त्या सर्वांनी फिर्यादी व त्याच्या मित्राला शिवीगाळ करुन
मारहाण केली. त्यांनी विरोध केला असता आरोपींपैकी एकाने लोखंडी रॉडने अरबाजच्या डोक्यात,
पाठीत मारुन गंभीर जखमी केले. फिर्यादी खाली पडले असता आरोपीने त्याच्या पॅन्टचे खिसे तपासून खिशातील
गाडी घेण्यासाठी असलेले 35 हजार रुपये आणि आयफोन कढून पळून गेले.
याबाबत अरबाज याने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गुमाने (API Gumane) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘इसको आज खतम करते है’ म्हणत तरुणावर पालघनने वार, खडकी मधील घटना

DySP Dalbir Singh | नवीन वर्षाच्या सिलिब्रेशननंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, मिळाला होता अर्जुन पुरस्कार

Hit and Run Law | ‘हिट अँड रन कायदा 2023’ च्या विरोधात देशभरातील वाहतूक संघटनांचे दिल्लीत आंदोलन

जखमी मित्राला नेण्यासाठी आलेल्या तरुणावर वार, कात्रज मधील घटना