Pune Pimpri Chinchwad Crime News | दाम्पत्याला शिवीगाळ करुन घरावर दगडफेक, कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | शतपावली करण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला सहा जणांच्या टोळक्याने शिवीगाळ केली. तसेच मेहुनीच्या मुलाला बॅटने मारहाण (Beating) करुन मध्यरात्री घरावर दगडफेक केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 31 डिसेंबर) रात्री अकरा आणि सोमवारी (दि.1) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास महंमदवाडी हडपसर (Mahamadwadi Hadapsar) येथे घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत किशोर प्रल्हाद वायदंडे (वय-43 रा. गल्ली नं. 5 कृष्णानगर, महंमदवाडी, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस
ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन रितेश खंडागळे, त्याचा मुलगा-पत्नी (सर्व रा. महंमदवाडी) आणि भोलेनाथ देडे (रा. कृष्णानगर) आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 324, 337, 427, 143, 144, 147, 149, 504,506 सह आर्म ॲक्ट (Arm Act) 4,(25) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर वायदंडे हे त्यांच्या पत्नीसोबत शतपावली करण्यासाठी गेले होते. कृष्णानगर येथील वॉशिंग सेंटर जवळ थांबले असताना आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी ‘तु इथं का थांबला आहे तु इथला भाई आहेस का’ असे म्हणत फिर्य़ादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. तसेच ‘मी इथला भाई आहे. तुला पाहून घेतो’ अशी धमकी दिली. फिर्यादी व त्यांच्या मेहुनीचा मुलगा हर्ष भिसे याला तलवार दाखवून हातातील बॅटने मारहाण करुन जखमी केले.

यानंतर फिर्यादी व त्यांची पत्नी घरी आले. आरोपींनी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्य़ादी यांच्या घरावर दगड,
विटा फेकून मारल्या. तसेच बॅट व लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या घराचे पत्रे, दरवाजावरील जाळी तसेच लाईट मिटर
तोडून नुकसान केले. आरोपींनी घरावर मारलेला दगड फिर्यादी यांच्या मुलाला लागल्यामुळे तो देखील गंभीर जखमी
झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे (PSI Balaji Digole) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

‘इसको आज खतम करते है’ म्हणत तरुणावर पालघनने वार, खडकी मधील घटना

DySP Dalbir Singh | नवीन वर्षाच्या सिलिब्रेशननंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, मिळाला होता अर्जुन पुरस्कार

Hit and Run Law | ‘हिट अँड रन कायदा 2023’ च्या विरोधात देशभरातील वाहतूक संघटनांचे दिल्लीत आंदोलन

जखमी मित्राला नेण्यासाठी आलेल्या तरुणावर वार, कात्रज मधील घटना