खून, अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार या सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हेगारास अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – खुन, दरोड्याचा प्रयत्न व अल्पवयीन मुलीचे लग्नाचे आमिश दाखवून अपहरण करणे अश्या प्रकारच्या सात गुन्ह्यात फरार असलेल्या सराइत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली आहे.

आगामी निवडणुकीचे अनुशंगाने गुन्हेगारीस आळा बसावा याकरीता विशेष कोंबिंग मोहिम गुन्हे शाखा करत आहे. पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी विशेष कोंबिंग केले. पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला व संदिप ठाकरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की टॉप 10 पाहिजे फरारी आरोपी दत्ता बाजीराव चव्हाण हा देहुगावामध्ये मित्राला भेटायला आला आहे. अशी बातमी मिळाल्याने सापळा रचला. पोलीसांचा सुगावा लागताच दत्ता चव्हाण (27, रा. लोंडेवाडी, विकास कॉलनी, भोसरी, मुळ गाव मौजे निगडी ता मावळ जि पुणे) हा पळुन जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. दत्ता चव्हाण याचा सखोल तपास केला असता त्याने गुन्हे केल्याचे कबुल केले.

तळेगाव एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्याच्या हद्दीत खून,दरोड्याचा प्रयत्न, चाकणमध्ये अपहरण, वडगाव मावळमध्ये अल्पवयीन मुलिस पळवून नेऊन लग्न, अत्याचार करणे, भंडारा जिल्हयातील दिघोरी पोलीस स्टेशन येथे अपहरण, नंदुरबार जिल्हातील नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे तोतया पोलीस या सारख्या गुन्ह्यात फरार असल्याचे समजले. चव्हाण हा वडगाव मावळ येथील गुन्हयामध्ये जामिनावर सुटलेपासुन हे गुन्हे करुन फरार आहे.

चव्हाण याने 28/09/2017 रोजी त्याचे साथिदारासह रामचंद्र खंडु येवले याचा अतिशय निर्घूणपणे खून केला होता. या गुन्ह्यात तो फरार असून या कालावधीमध्ये त्याने तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तसेच चाकण पोलीस स्टेशन हद्दीतून एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तीला पळवून नेवून तीची फसवणूक केली होती.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधिर हिरेमठ, सहा आयुक्त श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-5 चे पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक निरीक्षक श्राम गोमारे, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, संदिप ठाकरे, धनराज किरनाळे, मयुर वाडकर, दत्तात्रय बनसुडे, स्वामीनाथ जाधव, धनंजय भोसले, राजकुमार इघारे, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, श्यामसुदर गुट्टे, दयानंद खेडकर, गोपाळ ब्रम्हांदे व अतुल लोखंडे यांनी केली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी