गांजा विक्रीसाठी E- Pass चा उपयोग, पिंपरीमध्ये 10 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे नागरिक ई-पास द्वारे परवानगी घेऊन इतर जिल्ह्यात जाण्यास परवानगी दिली जात आहे. मात्र, चक्क ई-पासचा वापर गांजा विक्री करण्यासाठी झाल्याचे उघड झाले आहे. लातूरहून पिंपरी-चिंचवडमध्ये गांजा विक्री करण्यासाठीआलेल्याला पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून 10 लाख 15 हजारांचा 20 किलो 595 ग्रॅम गांजा आणि एक मोटार अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केली आहे. अल्लाबक्ष नजीर शेख वय 26 रा. महात्मागांधी रोड लातूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात अल्लाबक्ष गांजा विक्री करण्यास आल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानुसार पोलिसांनी वाकड, डांगे चौक आणि चिंचवड याठिकाणी सापळा रचून त्याला गांजासह अटक केली. त्याच्याकडे मोटारीत 20 किलो 995 ग्रॅम गांजा पाठीमागच्या सीटाखाली ठेवण्यात आला होता. पोलीस रात्री उशिरा नसणार याची खात्री बाळगून त्याने प्रवास सुरु केला. त्याच्या प्रत्येक हालचालींवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची करडी नजर होती. तो कुठे येणार याची माहिती काढून तीन ठिकाणी पथक सापळा रचून होते. मध्यरात्री पासून सकाळी पर्यंत ही पथके आरोपी ची वाट पाहत होती. अखेर अल्लाबक्ष चिंचवड येथील वाल्हेकरवाडी येथे आला. तो येताच त्याला मोटार आणि गांजासह अटक करण्यात आली.