माओवाद्यांशी संबंध असणारी थिंक टँकची रवानगी आर्थर रोड जेलला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एल्गार आणि कोरेगाव भीमा प्रकरणात माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपीवरून अटकेत असणारे थिंक टँकची रवाणगी आता आर्थर रोड जेल कारागृहात रवाणगी करण्यात आली आहे. एल्गारचा तपास एनआयएकडे गेल्यानंतर त्यांना मुंबईतील कारागृहात ठेवण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली होती.

सुरेंद्र गडलींग, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे, वरवरा राव, अरूण फरेरा, सुधीर भारद्वाज, शोमा सेन, वरून गोन्सालवीस यांना मुंबईतील अर्थर रोड कारागृहात हलविण्यात आले आहे. पुण्यातील शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषद आणि त्यानंतर कोरेगाव भीमा येथे उसळलेली दंगल यात माओवाद्यांचा हात असल्याचा समोर आले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी याचा तपास करताना या सर्वांना माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केली होती. पुणे न्यायालयात याप्रकरणाची सुनावणी सुरू होती. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू होता.

मात्र, केंद्र सरकारने हा गुन्हा एनआयएकडे तपासासाठी दिला. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे गेले. पुणे न्यायालयाने या सर्वांना 28 फेब्रुवारीपर्यंत एनआयएच्या न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, एनआयएने सर्वांना आर्थर रोड कारागृहात हलविण्याबाबत न्यायालयात विनंती अर्ज केला होता. त्यानुसार, न्यायालयाने या सर्वांना आर्थर रोड जेलला हलविण्याबाबत आदेश दिले. त्यानंतर बुधवारी या सर्वांना आर्थर रोड जेल कारागृहात हलविण्यात आले आहे.

You might also like