Corona काळात डिजिटल प्लॅटफॉर्मला बनवा ‘कमाई’चे साधन, नोकरी न करता असं मिळवू शकता ‘इनकम’, जाणून घ्या

कोरोना महामारीच्या दरम्यान देशभरात लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. अशा अवघड स्थितीत नोकरी शोधणे सोपे नाही. शिवाय बहुतांश कंपन्यांनी भरती बंद केली आहे, परंतु याच्याशिवाय काही क्षेत्र आहेत, जेथे घरात राहून पैसे कमावता येतील. जर टॅलेंट आहे, तर या अवघड स्थितीत पैसे कमावता येऊ शकतात. सध्या ऑनलाइनची अशी अनेक कामे आहेत, जी घरी राहून करता येऊ शकतात.

इंस्टाग्राम मार्केटिंग
जर फोटो आणि व्हिडिओच्या क्षेत्रात चांगली पकड आहे, तर इंस्टाग्राम मार्केटिंग चांगले ऑपशन आहे. सध्या लोक आपल्या इंस्टाग्रामवरून प्रॉडक्टचे प्रमोशन करतात, तसेच फोटो शेयर करून त्याच्या गुणांबद्दल देखील सांगतात. अशावेळी तुम्ही घर बसल्या आपल्या स्किलने पैसे कमावण्याचे साधन बनवू शकता.

फ्रिलान्स
घर बसल्या पैसे कमावण्यासाठी फ्रिलान्स चांगली पद्धत आहे. ही एक अशी पद्धत आहे, जी कोरोना महामारीच्या अगोदरसुद्धा लोक करत होते. ऑनलाइन प्रोजेक्ट किंवा कंटेट रायटिंग सारखी अनेक कामे आहेत जी फ्रिलान्सर म्हणून करू शकता. सध्या अनेक वेबसाइट आहेत, ज्या फ्रिलान्स काम करण्याची संधी देतात.

सोशल मीडिया मार्केटिंग कन्सल्टंट
सोशल मीडिया सध्या केवळ चर्चेसाठी नाही तर कमाईचे सुद्धा साधन बनले आहे. काम शोधण्यासह काम देण्यासाठी सुद्धा लोक याचा वापर करतात. प्रॉडक्शनच्या प्रमोशनसाठी कंपन्यांना सोशल मीडिया मार्केटिंग कन्सल्टटची गरज असते. अशावेळी तुम्ही या फील्डबाबत जाणकार असाल तर काम करू शकता.

आयटी स्पेशलिस्ट
प्रत्येक कंपनीला आयटी स्पेशलिस्टची आवश्यकता असते. या क्षेत्रातील थोडे ट्रेनिंग घेतले तर चांगला स्कोप क्रिएट करू शकता. यातून पैसे कमावण्याची चांगली संधी मिळू शकते.

ग्राफिक डिझायनर
ग्राफिक डिझायनचे काम फ्रिलान्सर किंवा पार्ट टाइम करू शकता. लिंक्ड-इनवर अनेक अशा पोस्ट शेअर केल्या जातात, ज्यासाठी ग्राफिक डिझायनरची आवश्यकता असते. घरी बसून तुम्ही या क्षेत्रात चांगले पैसे कमावू शकता.

स्किल सुधारण्यासाठी
टॅलेंट सुधारण्यासाठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो. याशिवाय काही नव्या गोष्टी शिकता येतील. लँग्वेज कोर्स किंवा अन्य ऑनलाइन शॉर्ट कोर्सची सध्या क्रेझ आहे. यातून स्किल डेव्हलप करू शकता आणि पैसे कमावण्याचे साधन बनवू शकता.