अरुणास्त ! अरुण जेटली अनंतात विलीन, पुत्र रोहनकडून मुखाग्नी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाचे माजी अर्थ आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली यांचे काल एम्स रुग्णालयात निधन झाले. आज दुपारी त्यांच्यावर दिल्लीतील निगमबोध घाट या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण जेटली यांना त्यांचे पुत्र रोहन यांनी मुखाग्नी दिला.

या अंत्यविधीसाठी निगमबोध घाट येथे नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. तसेच अंत्यसंस्कारावेळी गृहमंत्री अमित शहा, उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू तसेच भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री आशिष शेलारही यावेळी निगमबोध घाट येथे उपस्थित होते. तत्पूर्वी अरुण जेटली यांचे पार्थिव भाजपा मुख्यालयात ठेवण्यात आले होते यावेळी देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी येऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एम्स रुग्णालयाने पत्रक जारी करत अरुण जेटलींच्या निधनाची माहिती दिली. शनिवारी दुपारी १२.०७ वाजता जेटलींनी अखेरचा श्वास घेतल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.

जेटलींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तर, सोशल मिडीयातूनही त्यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त होत आहे. देशाची मोठी हानी झाल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –