कुत्र्यामुळं होत होता घटस्फोट, आता अभिनेत्याच्या पत्नीनं घेतला U Turn !

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अरुणोदय सिंह आणि ली एल्टन ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ली एल्टननं भोपाळ येथील कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिल्याची माहिती आहे. या न्यायालयानं जबलपूर उच्च न्यायालयानं दिलेल्या घटस्फोटाचा निर्णय ऐकवला होता. 2019 मध्ये भोपाळ फॅमिली कोर्टात दोघांचा घटस्फोट झाला होता. अरुणोदय सिंहनं 3 डिसेंबर 2016 रोजी कॅनेडियन प्रेयसी ली एल्टन हिच्यासोबत लग्न केलं होतं. अरुणोदयसोबत नातं बिघडल्यानंतर ती पुन्हा कॅनडाला गेली होती.

आता ली हिनं जबलपूर उच्च न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयानं दिलेल्या घटस्फोटाच्या निर्णयाला आव्हान दिलं असून हा आदेश रद्द करावा अशी मागणीही तिनं केली आहे. हाय कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत ली हिनं म्हटलं आहे की, तिला घटस्फोटासंदर्भातील कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 18 डिसेंबर 2019 रोजी तिला एकतर्फी घटस्फोट देण्यात आला आहे.

दरम्यान पाळीव प्राण्यामुळं या दोघांमधील नातं बिघडलं होतं असं बोललं जात आहे. आता ली हिच्या याचिकेवरील पुढील सुनावणी ही ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. 4 वर्षांपूर्वी अरुणोदय आणि ली यांनी मध्य प्रदेशातील भोपाळमधील केरवा धरणात 13 डिसेंबर 2016 रोजी हिंदू पद्धतीनं राजेशाही थाटात लग्न केलं होतं या लग्नाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like