Arvind Sawant | धनुष्यबाण वाद : हे भाजपाचे पडद्यामागील राजकारण, हा संविधानावर घाला, अरविंद सावंतांचा भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल!

मुंबई : Arvind Sawant | धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिवसेनेचे (Shivsena) की शिंदे गटाचे (Shinde Group) हा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर (Election Commission) आहे. निर्वाचित लोकप्रतिनिधींच्या संख्येच्या जोरावर शिंदे गट चिन्हावर दावा सांगत आहे. तर नोंदणीकृत पक्ष नियमावलीचा आधार घेत शिवसेना हे चिन्ह आपल्याकडेच राहील, असा दावा करत आहे. पक्षचिन्हाच्या वादावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी निवडणूक आयोगासमोरील सुनावणीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले की, या गोष्टींची एक प्रक्रिया आहे. आम्ही कागदपत्र सादर केली आहेत. अजून यात खरे-खोटे हे ही बघितले जाणार आहे. खोट्याच्या विटेवर ते सगळे उभे आहेत. शिवसेना म्हणजे काही आमदार-खासदार नाहीत. त्यांना जे कुणी निवडून देतात, ते लोक म्हणजे शिवसेना आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यासाठी काम करतात.

सावंत (Arvind Sawant) म्हणाले, केंद्रातील सत्ताधीश, भाजपा (BJP) ज्या प्रकारे पडद्यामागून हे सगळे राजकारण चालवतेय, तो प्रकार म्हणजे संविधानावर घाला घालण्याचे काम आहे. राज्यपालांकडूनही हे होत आहे.

अरवित सावंत पुढे म्हणाले की, भ्रम निर्माण केला जात आहे की त्यांच्यासोबतच सगळे आहेत. पण न्याय अस्तित्वात आहे. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य हे सगळे चिन्हावर निवडणूक लढणारे आहेत. ते आमच्यासोबत आहेत. फक्त आमदार-खासदार म्हणजे पक्ष नाही.

शिंदे गटाला सवाल करताना सावंत म्हणाले की, कार्यकारिणी म्हणजे काय? शिवसेना नोंदणीकृत पक्ष आहे. त्या नोंदणीकृत पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते निवडले गेले आहेत. त्यांची मुदत संपलेली नाही. त्यांना कुणी निष्काषित केलेले नाही. तुम्हाला कुणी अधिकार दिले? कोण तुम्ही?

सावंत यांनी भाजपावर आरोप करत म्हटले की, तुम्ही शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत बोललात का? नाही.
सुरत, गुवाहाटी, गोवा अशा बाहेरच्या राज्यांमधून आमच्या राज्यात काय करायचे हे तुम्ही ठरवणार का?
सुरत, गुवाहाटीला एवढे पोलीस का देण्यात आले? हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे.
पळालेल्या लोकांना संरक्षण देऊन त्यांच्या पक्षाच्या राज्यात करण्यात आलेला कारभार अनैतिक, असंवैधानिक आहे.

मोठी राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. 180 लोक आहेत.
पक्षाची एक घटना आहे. त्या घटनेनुसार पक्षाला मान्यता दिली आहे.
त्यानुसार शिवसेना राज्य पातळीवर नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्ष आहे, असे सावंत म्हणाले.

Web Title :- Arvind Sawant | shivsena mp arvind sawant slams cm eknath shinde group election commission hearing

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress | अंधेरीतील पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी

Udayanraje Bhosale | कास महोत्सवाला विरोध करणाऱ्यांना फारसे महत्व देत नाही – उदयनराजे भोसले

CM Eknath Shinde | ‘त्या’ ST कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून मोठा दिलासा ! उद्धव ठाकरेंचा आणखी एक निर्णय शिंदे सरकार बदलणार