Aryan Khan | आर्यन खानचा नोरा फतेही नंतर ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्री सोबत फोटो व्हायरल ; डेटिंगच्या चर्चा सुरू

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Aryan Khan | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. ड्रग्स प्रकरणातून क्लीन चीट मिळाल्यानंतर आर्यन खान हा विविध कारणांमुळे पुन्हा चर्चेत आला होता. नुकताच आर्यन खानला अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोबत पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आले होते. यानंतर हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर तुफान वायरल झाले होते. (Aryan Khan)

 

आर्यन आणि नोराच्या फोटो नंतर आता आर्यन खान सोबत एका पाकिस्तानी अभिनेत्रीचे नाव जोडले जात आहे. नव्या वर्षाच्या स्वागत पार्टीमध्ये या अभिनेत्रीला आर्यन खान सोबत पाहण्यात आले होते. त्या पाकिस्तानी अभिनेत्रीचे नाव आहे सादिया खान. आर्यन खानचे नाव नोरा सोबत जोडले गेल्यानंतर आता त्याचे नाव सादिया खान सोबत जोडले जात आहे. खुद्द सादियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आर्यन सोबतचा एक फोटो शेअर केल्यामुळे आर्यन आणि सादिया यांच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. आर्यन खान नोरा नंतर अभिनेत्री सादिया खान सोबत दिसल्याने आता नेटकरी सादिया आणि आर्यन एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. (Aryan Khan)

 

आर्यन खानच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास त्याला अभिनय क्षेत्रात रस नसून लेखन क्षेत्रात त्याला
पदार्पण करायची इच्छा असल्याचे मत शाहरुख खानने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते.
त्यानंतर आर्यनने त्याचा इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर करत स्क्रिप्ट पूर्ण झाल्याची माहिती दिली होती.
तर आता तो लवकरच त्याची ही स्क्रिप्ट प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी सज्ज झाला आहे.

 

Web Title :- Aryan Khan | arayn khan in relationship with pakistani actress sadia khan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘आम्ही…’

Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…

Pune Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या; हडपसर पोलिसांनी प्रियकराला केली अटक