Aryan Khan Drugs Case | ‘किंग’ खान ‘शाहरूख’कडे 25 कोटींची मागणी ! 18 कोटींवर डील झाली; NCB च्या वानखेडेंना 8 कोटी द्यायचे असं बोलणं सुरु होतं, ‘त्या’ बॉडिगार्डचा दावा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण देशात गाजत असलेल्या क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणामध्ये (Aryan Khan Drugs Case) मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनें (Kiran Gosavi) शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटी रुपयांची मागणी केली (demand for RS 25 crore) होती, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल (Bodyguard Prabhakar Sail) यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

 

 

एनसीबी रेडचे पंच क्रमांक 1 असलेले प्रभाकर साईल यांनी सांगितले, त्यांची या प्रकरणात पंच म्हणून सही घेतली होती. मात्र तो कागद ब्लॅक होता. रेडच्या दिवशी किरण गोसावीने त्यांना येलो गेटला बोलावलं आणि त्यानंतर साईलनं गोसावीला फोनवर बोलताना ऐकलं. साईलनं सांगितलं की, माझ्या जीवाला धोका होता म्हणून मी माझ्या परिचिताकडे सोलापूरला 10 ते 12 दिवस राहिलो. (Aryan Khan Drugs Case)

गोसावीचे चोरुन लपून व्हिडीओ शूट

साईल यांनी गोसावीचे चोरुन लपून व्हिडीओ शूट केले. त्यात गोसावी आर्यन खानला मोबाईलवर बोलायला लावलं असं दिसतंय. त्यात 25 कोटीची मागणी केली. त्यावर 18 कोटींवर डील झाली आणि मी ऐकलं त्यानुसार समीर वानखेडेंना (Sameer Wankhede) 8 कोटी द्यायचे आहेत असं बोलणं सुरु होतं, असा दावा साईलने केला आहे.

कारवाईच्या दिवशी नेमकं काय झालं

प्रभाकर साईलनं सांगितलं, क्रूझ कारवाई झाली त्यादिवशी मी किरण गोसावी सोबत होतो. किरण गोसावी एनसीबी (NCB) ऑफिसला गेले… मी खालीच थांबलो होतो. गोसावी बरोबर सव्वा बाराच्या सुमारास खाली आले. आम्ही तेथून जवळच जाऊन फ्रॅकी, थम्स अप घेतलं. तिथून ग्रीन गेटला गेलो. ग्रीन गेटच्या आत गेलो तिथे समीर वानखेडे, त्यांचे सहकारी बसले होते. तिथे त्यांना फ्रॅकी आणि पाणी-थम्सअप वगैर दिले. नंतर क्रुझच्या बाहेर गेलो. तिथुन मला एकाठिकाणी थांबवून बाहेर जाऊ नको असे सांगण्यात आले. मला काही फोटो दाखवण्यात आले होते व ते फोटो असलेले लोक आले की त्यांना ओळखायला सांगितले होते. फोटोतल्या व्यक्ती आल्या की माला गोसावींना रिपोर्ट करायाचा होता, असेही साईलनं सांगितले.

Chandrakant Patil | भाजपला हरवणे सोपे नाही, BJP चा राष्ट्रवादीला इशारा

आर्यन माझ्यासमोरच आले

साईलनं सांगितलं की, क्रूझवर घेऊन जायला एक बस होती. बसमधून कोण जात त्याला ओळखण्यास सांगितले. 2700 नंबरच्या बसमध्ये फोटोमधील एक व्यक्ती बसली त्यालाच मी ओळखलं. इतरांना ओळखलं नाही कारण सर्वांनीच मास्क घातले होते. 4.29 वाजता मला फोटो दिले त्यातील 13 व्यक्ती आल्या आहेत असा मेसेज दिला. आर्य़न खान माझ्यासमोरच आले होते. त्यांना घ्यायला बस नाही तर क्रुझवरची व्हिआयपी गाडी (VIP car) आली होती. कारवाई करताना मी क्रुझवर (Aryan Khan Drugs Case) नव्हतो. क्रूझच्या गेटवर होतो. क्रुझवर मी 11.30 च्या दरम्यान पोहोचलो.

काळ्या कागदावर सह्या करायला लावल्या

मी आणि किरण गोसावी आणि मनिष भानुशाली (Manish Bhanushali) हे बाहेरचे लोक होतो. क्रुझवर कारवाई दरम्यान किरण गोसावी, वानखेडे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. साडे अकराच्या दरम्यान मी बोर्डींग होते तिथे गेलो. त्यावेळी मी आर्यन खानला केबिनमध्ये बसलेले बघितलं. एनसीबी कार्यालयात जेव्हा पावणेबाराला सगळ्यांना आणलं. तेव्हा पंचाचा साक्षीदार म्हणून मला सही करायला एनसीबी कार्यालयात बोलावले. त्याठिकाणी साळेकर नावाच्या एनसीबी अधिकाऱ्याने मला ब्लॅक पेपरवर (black paper) सह्या करायला सांगितल्या. मी याबाबत किरण गोसावींकडे ब्लॅक पेपरवर कश्या सह्या करुन असं विचारलं तेव्हा समीर वानखेडे तिथे आले. ते म्हणाले काय होत नाही तू कर सह्या. मी सह्या केल्या 9 ते 10 ब्लॅक पेपरवर मला सह्या करण्यास सांगितले. माझं आधारकार्ड मी त्यांना व्हॉट्सअ‍ॅप केलं. पंच म्हणून जेव्हा माझी सही घेतली तेव्हा पेपर पूर्ण ब्लॅक होते, असे साईलने सांगितले.

Pune Petrol Price | ‘पेट्रोल-डिझेल’च्या दराचा दररोज नवीन ‘उच्चांक’; जाणून घ्या नवे दर

गोसावीने आर्यनचं बोलणं करून दिलं

एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे ऑफिसमध्ये सॅनिटरी पॅड, प्लास्टिकच्या बरण्या असं सामान होते. कार्यालयात तेव्हा एका खुर्चीवर आर्यन खान आणि त्याच्या शेजारी किरण गोसावी बसले होते. तेव्हा मी त्यांचा गुपचुप व्हिडिओ शुट केला. व्हिडिओमध्ये किरण गोसावी एका फोनवर आर्यनचं कुणाशी तरी बोलणं करुन देत होता.

18 कोटींना डिल फायनल

साईलने सांगितले की, किरण गोसावी यांच्याकडे 22 जुलै पासून बॉडिगार्ड म्हणून काम करतो. गोसावी कारवाईच्या अगोदर अहमदाबाद वरून निघाले होते. किरण गोसावी पावणेतीनला एनसीबी ऑफिसच्या खाली आले. तेव्हा सॅम नावाच्या एका व्यक्तीचा गोसावी यांना फोन आला. रात्रीतून दोन वेळा त्यांची मिटींग झाली. साडेचारला एनसीबीहून लोअर परळला निघालो. तेव्हा त्यांनी सॅमला फोन केला. फोनवर म्हणाले ‘उनको बोल 25 कोरड में डील करने के लिये. 18 करोड मे फायनल कर. 8 करोड वानखेडे को देना है’ सॅम हा शाहरुख आणि गोसावी यांच्या मधला को ऑर्डीनेटर होता.

Shivajirao Bhosale Bank Fraud | शिवाजीराव भोसले बँक आर्थिक घोटाळा प्रकरणात साताऱ्यातून आणखी एकाला अटक

कागदी पिशव्यांमधून पैसे घेतले

साईलने पुढे सांगितले की, मला लोअर परळला दोन गाड्या दिसल्या.
त्यापैकी एका गाडीत पुजा ददलानी (Puja Dadlani) होती. किरण गोसावी, सॅम आणि पुजा यांच्यामध्ये 15 ते 20 मिनीटे बोलणे झाले. 3 तारखेच्या साडेपाचला सकाळी पुन्हा गोसावींना सॅमचा फोन आला. पूजा तेव्हा फोन उचलत नसल्याचे सॅम सांगत होता. किरण गोसावींनी साडेचारच्या दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप कॉल केला आणि कारवाई नंतरच्या डीलबाबत सांगितले. पाचपर्यंत मला पुन्हा किरण गोसावीचा फोन आला. अर्जंट ताडदेव रोडला इंडीयाना हॉटेल (Indiana Hotel Taddev Road) बाहेरुन पैसे कलेक्ट करायचे आहेत. त्याठिकाणी 5201 नंबरची गाडी होती. तिथे दोन कागदी पिशव्यांमधून 50 लाख रुपये घेऊन मी सांगितल्याप्रमाणे वाशीला आलो.

सॅमला 38 लाख रुपये दिले

वाशीला आल्यानंतर ते पैसे सरांना दिले. सर आणि त्यांची मिसेस बॅग घेऊन निघणार होते. संध्याकाळी पाचला वाशी इनॉर्बिट मॉलला (Vashi Inorbit Mall) बोलावून किरण गोसावींनी मला पुन्हा पैशाची पिशवी दिली. तिथुन मी ओलाने चर्चगेटला गेलो. ती पिशवी सॅमला दिली त्यामध्ये 38 लाख रुपये होते. सॅमने याबाबत गोसावीला विचारणा केली असता गोसावीने दोन दिवसांत व्यवस्था करतो असे सांगितल्याचे साईलनं सांगितलं.

समीर वानखेडेंकडून मला धोका

त्याने सांगितले की मी शांत राहिलो कारण माझा फॅमिली प्रॉब्लेम आहे.
माझ्याकडे राहयला घर नसल्याने मी गोसावी यांच्याकडे 24 तास काम करायचो.
त्यांच्याकडे राहयचो. मला काही दिवसांनी पत्नीचा फोन आला तीने सांगितले की त्यांना पोलिसांचे फोन येत आहेत.
मला भीती वाटली की माझ्या फॅमिलीकडे पोलीस का येत आहेत.
स्वाभिमानी रिपब्लिक पार्टीच्या संस्थापकाकडे मी आलो आणि आता त्यांच्याकडे आहे.
मला कारवाईनंतर दोन दिवस फोन बंद करायला लावला. माझा पगार देखील त्यांच्याकेड बाकी आहे.
एवढ्या दिवसांत माझं कोणासोबतही बोलणं झालेलं नाही.
मला भीती वाटतेय की मी पंच म्हणून उभा राहिलो.
मला समीर वानखेडेंकडून धोका असल्याचे प्रभाकर साईलनं सांगितलं.

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Aryan Khan Drugs Case | aryan khan drugs case demand for rs 25 crore from shah rukh khan saying will give rs 8 crore to sameer wankhede shocking assassination of kiran gosavi bodyguard

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update