Pune Petrol Price | ‘पेट्रोल-डिझेल’च्या दराचा दररोज नवीन ‘उच्चांक’; जाणून घ्या नवे दर

पुणे : Pune Petrol Price  | पेट्रोल, डिझेलच्या दरात होत असलेली भाववाढ काही केल्या थांबताना दिसून येत नाही़ तेल कंपन्यांनी गेल्या सोमवार व मंगळवारी दरात वाढ केली नव्हती. त्यानंतर गेल्या पाच दिवसात सलग दररोज भाववाढ करण्यात येत (Pune Petrol Price  ) आहे.

रविवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर ११२.९३ रुपये लिटर झाला आहे.

डिझेलच्या दरातही आज लिटरमागे ३८ पैशांनी भाववाढ करण्यात आली आहे. आज डिझेलचा दर १०२.२८ रुपये लिटर झाला आहे.

पॉवर पेट्रोल आज लिटरमागे ३४ पैशांनी महागले आहे. पुण्यात आज पॉवर पेट्रोलचा दर ११६.६२ रुपये लिटर इतका झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होत असलेल्या दररोजच्या भाववाढीमुळे सर्वच व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाला चांगलाच महागला आहे. इतरही वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सर्वच बाबींमध्ये चांगलीच भाववाढ झाली आहे.

हे देखील वाचा

EPFO | तुमच्या PF अकाऊंटमध्ये व्याज आले का? ‘या’ 4 पद्धतीने तात्काळ जाणून घ्या

Life Expectancy Decreased | कोरोनाच्या नंतर 2 वर्षांनी कमी झाले लोकांचे वय; स्डीमध्ये झाला आश्चर्यकारक ‘खुलासा’

Narayan Rane | ‘संजय राऊत यांना हिंदुत्व कळले नाही म्हणून शिकवायची वेळ आली’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Petrol Price  | Petrol-diesel prices hit new highs every day; Learn new rates

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update