Chandrakant Patil | भाजपला हरवणे सोपे नाही, BJP चा राष्ट्रवादीला इशारा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवडमध्ये आमचे आमदार, नगरसेवक कसे नीट वागतील, ते आमच्याकडेच कसे राहतील याची काळजी करण्यास भाजप (BJP) समर्थ आहे. पहिल्यांदा अजित पवार (Ajit Pawar) येतात, त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आले आणि त्यापाठोपाठ खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) तर मध्येच रोहित पवार (Rohit Pawar) म्हणजे एका महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार, अजित पवार यांना लक्ष घालण्याची वेळ आली आहे. याचाच अर्थ असा आहे की, भाजपला पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) हरविणे सोपे नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हंटले आहे. शनिवारी रावेत भागात एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले असताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

EPFO | तुमच्या PF अकाऊंटमध्ये व्याज आले का? ‘या’ 4 पद्धतीने तात्काळ जाणून घ्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आर्यन खान प्रकरणावरून (Aryan Khan case) महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हंटले होते. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, शेतकऱ्यांचे सारे प्रश्न आता संपलेत. त्यांची दिवाळी खूप चांगली जाणार आहे. बाकी काही कामधाम नाही. त्यामुळे आता वेळ मिळाला आहे तर शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मुलाचे बघू अशा पद्धतीने सरकारचे जे काही चालले आहे ते बरोबर नाही. जरंडेश्वर कारखान्याबाबतही (Jarandeshwar Factory) पाटील भाष्य केलं. ते म्हणाले, ईडी चौकशी च्या (ED Inquiry) अखत्यारीत जरंडेश्वरचा विषय येत आहे. वास्तविक 64 कारखान्याची चौकशी असेल तर ती करावी. आम्ही कोणालाही अडविले नाही. मुळातच बाकीचे कारखाने कमी किमतीत विकले गेले आहेत. त्यांना कमी किंमत का मिळाली? याची राज्य सहकारी बँकेने (State Co-operative Bank) चौकशी केली पाहिजे. आणि तीच आमची मागणी असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.

महिला अत्याचाराच्या दररोज चार घटना राज्यात घडत आहेत. त्यावर तातडीने उपाय योजना सरकार का करत नाही? एक सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडत आहे की शाहरुख खानच्या मुलाचा सर्वांना इतका पुळका का आला आहे. आर्यनला जामीन मिळत नाही म्हणून एवढी तडफड करण्यासारखे काय आहे त्यात ?, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

हे देखील वाचा

Pune Petrol Price | ‘पेट्रोल-डिझेल’च्या दराचा दररोज नवीन ‘उच्चांक’; जाणून घ्या नवे दर

 

Shivajirao Bhosale Bank Fraud | शिवाजीराव भोसले बँक आर्थिक घोटाळा प्रकरणात साताऱ्यातून आणखी एकाला अटक

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Chandrakant Patil | it is very difficult to defeat bjp in the city bjp leader chandrakant patil on ncp in pimpri chinchwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update