दोषींना ‘फाशी’च ! माझ्या मुलीला आज अखेर न्याय मिळाला, निर्भयाची आई ‘भावूक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली निर्भया बलात्कार केसवर पटियाला हाऊस न्यायालयाने निर्णय दिला आहे. 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता निर्भयाच्या 4 दोषींना फाशीची देण्यात येणार आहे. निर्भयाच्या गुन्हेगारांच्या विरोधात न्यायालयाकडून डेथ वारंट जारी करण्यात आले आहे. याप्रकरणातील गुन्हेगारांच्या शिक्षेच्या याचिकेवर सुनावणी झाली. यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. हा निर्णय आल्यानंतर माझ्या मुलाला अखेर न्याय मिळाला अशी भावनिक प्रतिक्रिया निर्भयाची आई आशा देवी यांनी दिली.

निर्भयाच्या आई आशा देवी यांनी न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या की माझ्या मुलीला अखेर न्याय मिळाला आहे. या चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने देशातील महिला सशक्त होतील. या निर्णयाने देशातील जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास आधिक वाढेल.

निर्भयाची आई सुनावणीपूर्वी म्हणाल्या होत्या की आम्ही कधीच म्हटलं नाही की त्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी. जी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे ती पूर्ण झाल्यावर न्यायालयाने निर्णय सुनवावा. आम्ही त्याचसाठी न्यायालयात अनेक वर्षापासून खेटे घालत आहोत. आता दोषींची कोणतीही याचिका उरलेली नाही. आता आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालय या प्रकरणी अंतिम निर्णय देईल.

आता दोषांना 15 दिवसांचा दया याचिकेचा पर्याय उपलब्ध आहे. परंतु आरोपींचे वकील अय्यर ए. पी. सिंग म्हणाले की आम्ही या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करु.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/