अजब ! स्मिथच्या फलंदाजीच्या ‘या’ प्रकाराने प्रेक्षक ‘अचंबित’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरु असलेल्या ऍशेस मालिकेत  शेवटच्या आणि चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 170 धावा झाल्या आहेत. सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या संघाने पहिल्या दिवसाच्या अखेरपर्यंत ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत असून  खराब हवामानामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला होता.

या सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेन याने केलेल्या उत्तम फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रलियाने हि धावसंख्या उभारली असून त्यांचे सलामीवीर स्वस्तात परतल्यानंतर या दोघांनी भागीदारी केली. लाबुशेनसोबत 116 धावांची भागीदारी करत स्मिथ हा दिवसअखेर नाबाद आहे. मात्र त्याच्या या खेळीच्या दरम्यान त्याने मारलेल्या एका फटक्याने सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा होत असून हा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या अजब फटक्याच्या जोरावरच त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर त्याने खेळलेला हा फटका थेट चौकार बनत त्याला चार धावा देऊन गेल्या. त्यानंतर त्याच्या या फटक्याला पाहून मैदानातील प्रेक्षकांसह समालोचकांना देखील हसू आवरले नाही.

https://twitter.com/cuzzybru/status/1169281625504567298

जबरदस्त फॉर्ममध्ये स्मिथ

बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर पुनरागमन केलेला स्मिथ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने या ऍशेस मालिकेत आतापर्यन्त 2 शतक आणि 2 अर्धशतकांच्या साहाय्याने 400 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कसोटी सामन्यात सलग 8 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम देखील त्याने या मालिकेत केला आहे. त्यामुळे तो कसोटी क्रमवारीत देखील पहिल्या क्रमांकावर असून भारतीय कर्णधार विराट कोहली याला देखील त्याने या क्रमवारीत नुकतेच मागे टाकले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

वयाच्या पंचेचाळिशीत मलायका कशी आहे फिट, जाणून घ्या तिचा ‘डाएट प्‍लॅन’

फालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी