…हे तर ’फटकारे’ खाणारे सरकार ! – आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई विद्यापीठामधील कुलसचिव नियुक्तीवरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिलाय. राज्य सरकारने डॉ. रामदास अत्राम यांची केलेली नियुक्ती उच्च न्यायालयाने स्थगित केलीय. तसेच, बळीराम गायकवाड यांच्याकडे पुन्हा एकदा त्या पदाची सूत्रे तात्काळ देण्याचे आदेश डॉ. रामदास अत्राम यांना दिलेत. यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. परीक्षेच्या मुद्द्यावरून तोंडघशी पडलेल्या ठाकरे सरकारचा अहंकार न्यायालय पुन्हा उतरवते आहे. हे तर ’फटकारे’ खाणारे सरकार आहे, असे आशिष शेलार यांनी म्हटलंय.

भाजपचे आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. मुंबई विद्यापीठामध्ये ठाकरे सरकारने मनमानी करीत नियुक्त केलेल्या कुलसचिवांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती. बळीराम गायकवाड यांना पुन्हा प्रभार…. परीक्षेच्या मुद्द्यावरून तोंडघशी पडलेल्या ठाकरे सरकारचा अहंकार न्यायालय पुन्हा उतरवत आहे. हे तर फटकारे खाणारे सरकार!, असे ट्विट करत आशिष शेलार यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय.

 

 

 

 

 

 

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. रामदास अत्राम यांची नियुक्ती केली होती. नवनियुक्त कुलसचिवांच्या नियुक्तीविरोधात मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य धनेश सावंत यांनी थेट उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.

यावरील सुनावणीवेळी राज्य सरकारने डॉ. रामदास अत्राम यांची केलेली नियुक्ती उच्च न्यायालयाने स्थगित करून बळीराम गायकवाड यांच्याकडे पुन्हा पदाची सूत्रे तात्काळ देण्याचे आदेश डॉ. रामदास अत्राम यांना दिलेत. त्यामुळे याप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिलाय.