Ashish Shelar | भाजप नेते आशिष शेलार यांचे संजय राऊत यांना खडे बोल; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Ashish Shelar | मुंबई महापालिकेत कोरोनाकाळात झालेल्या घोटाळ्याबाबत करण्यात येणाऱ्या चौकशीसाठी ईडीकडून मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना नोटीस बजावण्यात आली असून याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. यावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘कोरोनाकाळात डॉक्टर आणि परिचारिकांनी पळ काढला होता,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर इंडियन मेडिकल असोशिएशनने आंदोलनाचा इशारा दिला. त्यातच आता त्यांच्या या वक्तव्याबद्दल भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.
आज (दि.१८) माध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार म्हणाले की, ‘या महाराष्ट्रात बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्याचं नाव म्हणजे संजय राऊत आहे. बेतालपणे बोलायचं अगदी पातळी सोडून बोलायचं. असंबंध बोलायचं. दुर्दैवं आहे की अशा पद्धतीने ज्या डॉक्टारांनी, परिचारिकांनी, पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करोना काळात खऱ्या अर्थाने स्वत:चा जीव धोक्यात घालून, राज्याची आणि जनतेची सेवा केली, त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलायचं. यांनी अहंकाराचा परमोच्च बिंदू गाठला आहे, म्हणून जनता यांना सोडणार नाही. जर डॉक्टर्स आंदोलन करणार असतील तर त्यांना आमचं समर्थन आहे आणि त्यांच्या आंदोलनातील मागण्याही चुकीच्या नाहीत. खरंतर संजय राऊतांनी माफी मागितलीच पाहिजे.’ असं आशिष शेलार म्हणाले.
राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे.
त्यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ‘खाई त्याला खवखव.
उगाच बसून जीभ नाकाला लावण्याचे धंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने करू नये.
स्वत: काही केलं नाही, स्वत:ला काही करता आलं नाही.
दावोसमध्ये जाऊन एक लाख कोटींच्या वर सामंजस्य करार मुख्यमंत्री करत आहेत.
या ठिकाणी लाखो मुंबईकर स्वत:चं स्वप्नपूर्ती होते आहे, त्यात संमेलीत होत आहेत.
मग यामध्ये मी कुठे हे दाखवण्याचा त्यांचा वायफळ प्रयत्न आहे.
म्हणून माझा सल्ला आहे, जीभ नाकाला लावायचा प्रयत्न करू नका.’
अशी खोचक टीका आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर केली.
Web Title :- Ashish Shelar | bjp leader ashish shelar criticizes shivsena mp sanjay raut and uddhav thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update