भाजपचा Lockdown ला विरोध ? आशिष शेलार म्हणाले..

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला आहे. लॉकडाऊन होणार असल्याने चर्चेला उधाण आलं आहे. तर भारतीय जनता पार्टीने संपूर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आणखी एकदा आणखी एकदा सरकारवर सडकून टीका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले, आज एक वर्षानंतर करोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असे बरेच काही उपलब्ध आहे. तेव्हा राज्यातील तेच हुशार सत्ताधारी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असे सांगतात. आम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाही किंवा लॉकडाऊनला विरोधही करत नाही. कारण जनतेचा जीव महत्त्वाचा आहे, असते आशिष शेलार यांनी म्हटले आहे. तसेच, मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारने रस्तोरस्ते, घरोघरी मदत पोहोचवली, धान्य निवारा दिला. आज मजुरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत रेल्वे स्थानकांवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार, अशी टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.

शेलार पुढे म्हणाले, एका वर्षापूर्वी जेव्हा करोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहित नव्हता. आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला. त्यावेळी राज्यातील सत्ताधाऱ्यांनी भाजपला आरोपाच्या पिंजऱ्यात उभं केलं, असे ते म्हणाले. यादरम्यान, महाराष्ट्रात भाजप पक्षाकडून लॉकडाऊनला विरोध होत असताना महाविकास आघाडीतील नेत्यांनी पंतप्रधान मोदींनी लागू केलेल्या लॉकडाऊनचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर टीका केली होती. या मुद्द्यावरूनच भाजप नेते शेलार यांनी उत्तर दिले आहे.