Video : ‘अशी नागरिकता देणं जर गुन्हा असेल तर इंदिरा गांधीजींच्या काळात…’ : आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अशी नागरिकता देणं जर गुन्हा असेल तर इंदिरा गांधीजींच्या काळात युगांडातून आलेल्या त्या प्रताडित नागरिकांना नागरिकता कशी दिली असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी सीएएला विरोध करणाऱ्यांना केला आहे. रविवारी वसईत झालेल्या एका सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सीएएवर भाष्य केलं.

वसईतील सभेत बोलताना आशिष शेलार म्हणाले, “अशी नागरिकता देणं जर गुन्हा असेल तर इंदिरा गांधीजींच्या काळात युगांडातून आलेल्या त्या प्रताडित नागरिकांना कशी नागरिकता दिली. आज हा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित केला जातो त्यावेळेस सीएएला विरोध करणारे मात्र त्याचं उत्तर देत नाहीत. कधी ना कधी अखंड भारत आम्हाला घ्यायचाय ती भूमिका आमची आहे तो विषय वेगळा आहे. परंतु आज जर सीएएच्या कायद्याची भूमिका मांडायची झाली तर जो प्रताडीत आहे आणि 2014 पूर्वीचा आहे, ज्याला जगात अन्य कुठे नागरिकत्व मिळणार नाही आणि तो इथं खितपत पडला आहे त्याला नागरिकत्व द्यायचं आहे.” असंही शेलार म्हणाले.

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, “इथल्या काही संघटना विशेष करून दुर्भाग्यानं मुस्लिम संघटना आहेत ज्यांना भडकवण्यात आलं आहे.” असंही त्यांनी सांगितलं.

आशिष शेलार म्हणाले, “आर्टीकल 14 बद्दल जे संशयाचं वातावरण निर्माण करत आहेत आणि आर्टीकल 14 चा उपयोग पूर्ण पाकिस्तानमधील मुस्लिम समाजाला, पूर्ण बांग्लादेशातील मुस्लिम समाजाला आणि पूर्ण अफगाणिस्तानातील मुस्लिम समाजाला भारतीय नागरिकत्व द्या अशाच अर्थाच विधान करत आहेत. “