
Ashish Shelar | दावोस दौऱ्यासंदर्भात संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणजे ‘खाई त्याला खवखव’, आशिष शेलारांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दावोस येथे 16 जानेवारी पासून आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषद (International Economic Conference) होणार आहे. या परिषदेला देशातील सर्व प्रमुख गुंतवणूक आणण्यासाठी जाणार आहेत. 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर येणार असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दावोसचा दौऱा अर्ध्यात सोडून येणार असल्याची माहिती समोर आली. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी सरकारवर टीका केली. राऊत यांच्या टीकेला भाजप (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दावोस दौऱ्यासंदर्भात संजय राऊत यांची प्रतिक्रिया म्हणजे ‘खाई त्याला खवखव’ असा टोला आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी लगावला आहे.
आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, मला असं वाटतं, ज्यांचा अभ्यास कच्चा आहे आणि ज्यांकडे घरात पाटी असती तर बरं झालं असतं. रोज अबकड काढता आलं असतं, तर थोडं ज्ञानही मिळालं असतं. अशा संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणजे ‘खाई त्याला खवखव’ याच्या पलिकडे काहीही नाही.
दावोस दौऱ्यासंदर्भात @rautsanjay61 यांची प्रतिक्रिया म्हणजे ‘खाई त्याला खवखवे.’@BJP4Mumbai @BJP4Maharashtra pic.twitter.com/GAELXAc4ii
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 12, 2023
शेलार पुढे म्हणाले, दावोसमध्येही जाऊन मंत्री महाराष्ट्राच्या हिताचे करार करणार आहेत.
ते जातील करार करुन आल्यावर संजय राऊत तोंडावर पडतील. आपण त्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारा.
मुंबईकरांची सेवा करणे ही देखील प्राथमिकता आहे. दोन्ही बाजूचं काम हे सरकार करत आहे.
त्यामुळे आता हाताला काम राहिलं नाही तर तोंडाची पट्टी चालवणे यापेक्षा संजय राऊत काहीही करत नसल्याचे त्यांनी म्हटले.
Web Title :- Ashish Shelar | Sanjay Raut’s reaction to Davos tour is ‘Khai aye khavkhav’, Ashish Shelar’s reply (Video)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Satyajit Tambe | ‘मी काँग्रेसचाच उमेदवार’, सत्यजीत ताबेंनी सांगितलं अर्ज भरण्यामागचं कारण