भाजपचं कुत्रं तरी स्वातंत्र्याच्या लढाईत होतं का ? : अशोक चव्हाण

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन – काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. याउलट भाजपच्या नेत्यांनी ब्रिटीशांसोबत हातमिळवणी केली. भाजपचं कुत्रं तरी स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी झाले होते का? असा खोचक सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपला लक्ष्य केले. जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचा गाळप शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.

अशोक चव्हाण म्हणाले की, शासनाच्या धोरणामुळे साखर उद्योग कमालीचा अडचणीत आला आहे. सरकारने एफआरपीच्या नावाखाली शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचे आदेश जारी केले. मात्र, साखरेचा भाव पाडण्यासाठी थेट पाकिस्तानातून साखर आयात करण्याचा कुटील डाव भाजपने सुरू केला आहे. गेल्या वर्षी भाऊराव साखर कारखान्याच्या ४ युनिटमधून १४ लाख मे. टनाचे गाळप करण्यात आले. यंदा अंदाजे १२ साडेबार मे. टन ऊस गाळप अपेक्षित आहे. सध्या बाजारात २ हजार ९०० रूपये प्रती क्विंटल प्रमाणे साखर विकली जात आहे. तसेच एफ. आर. पी. च्या नावाखाली शासनाकडून ऊसाला प्रती टन २ हजार ५५० रूपये भाव देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात साखरेचा भाव कमी असल्याने कारखान्याचे व्यवस्थापन, कामगार वेतन, वाहतूक आणि दुरुस्तीची खर्च लक्षात घेता प्रती टन ६०० रुपये तोटा सहन करावा लागत आहे.

बाळासाहेबांच्या नावाच्या विमा योजनेला भाजपने दाखवला कात्रजचा घाट 

जायकवाडी प्रकल्पातील मराठवाड्याच्या हक्काचे वरच्या भागातील पाणी नाशिक, अहमदनगरने अडवले. जायकवाडी प्रमाणेच उध्र्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्याचा उपसा करून धरणाच्या वरील भागाला देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. मात्र, भाजप-सेनेचे कार्यकर्ते याबद्दल ब्र देखील काढायला तयार नाहीत. याकडे सोशल मीडियाच्या नेत्यांनी लक्ष द्यावे. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची भेट घेऊन यासंदर्भातील माहिती दिली आहे. या समस्येवर तोडगा न निघाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे चव्हाण म्हणाले.